Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गेलेल्या खेळाडूंना जेवण मिळेना! बॉक्सर अमित पंघालने बाहेरून केली ऑर्डर

| Updated on: Jul 26, 2024 | 9:48 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची जय्यत तयारी झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून मैदानं, व्यवस्थापन केलं जात आहे. आता कुठे त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे. असं असताना खेळ गावात खेळाडूंना जेवणासाठी वणवण फिरावं लागत असल्याचं दिसत आहे. याबाबतच्या तक्रारी भारतीय चमूतील काही खेळाडूंनी केल्या आहेत.

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गेलेल्या खेळाडूंना जेवण मिळेना! बॉक्सर अमित पंघालने बाहेरून केली ऑर्डर
(Photo: Getty Images)
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जगभरातील 200हून अधिक देश या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत जगभरातील 10 हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. भारताकडून 117 खेळाडूंचा चमू पॅरिसमध्ये पोहोचला आहे. भारताच्या 117 खेळाडूंची खेळगावतल्या सात मजली ब्लॉकमधील 30 अपार्टमेंटमध्ये व्यवस्था करण्यात आली आहेत. असं असताना त्यांना तिथे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. खासकरून खेळाडूंना जेवणासाठी वणवण भटकावं लागत आहे. रोजचं जेवण मिळवणं एक मोठा प्रश्न झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार,भारतीय स्पर्धक जेव्हा जेवणासाठी खेळगावमधील हॉलमध्ये गेले तेव्हा त्यांना तिथे जेवणच मिळालं नाही. शटलर तनीषा क्रास्टोने सांगितलं की, जेव्हा 25 जुलैला जेवणासाठी हॉलमध्ये गेली. तेव्हा तिला कळलं की मेन्यूमध्ये राजमा आहे. पण तिथपर्यंत जेवण संपलं होतं. इतकंच काय भारतीय बॉक्सर अंतिम पंघालला आवडीचं जेवण मिळवण्यासाठी धडपड करावी लागली. तिने सपोर्ट स्टाफकडे ‘दाल-रोटी’ खाण्याची इच्छा व्यक्त केली. कारण गेल्या अनेक वर्षांपासून पंघाल असाच डाएट फॉलो करत आहे. त्यामुळे तिच्यासाठी बाहेरून जेवण ऑर्डर करावं लागलं.

पॅरिसच्या खेळगावमध्ये जेवणच नाही तर स्टेडियममध्ये जाणं येणं देखील अडचणीचं ठरत आहे. तनीषाने सांगितलं की, गाड्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार येत नाही. त्यामुळे ऐन स्पर्धेवेळी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे स्पर्धेसाठी वेळेआधीच खेळगावमधून निघावं लागणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची सुरुवात तीरंदाजी स्पर्धेने होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागणार आहे. तसेच 27 जुलैला होणाऱ्या शूटिंग इव्हेंटमधून पहिलं पदक मिळू शकतं.

पेरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतीय क्रीडाप्रेमींना फार अपेक्षा आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एका सुवर्ण पदकासह सात पदकं मिळवली होती. आता त्यापेक्षा जास्त पदकांची अपेक्षा आहे. खासकरून पाच नवोदित खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आहे. या खेळाडूंमध्ये निखत जरीन, सिफ्ट कौर सम्रा, अंतिम पंघाल, धीरज बोम्मादेवरा आणि रीतिका हुड्डा यांचा समावेश आहेत. महिला कुस्तीपटू अंतिम पंघालकडून फार अपेक्षा आहेत. तिची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे.