पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा वेगवेगळ्या कारणांमुळे गाजली. बॉक्सर इमान खलीफचा वाद खूपच चर्चेत आला होता. कारण एका एका दिग्गज महिला बॉक्सर्संना एका पंचमध्ये गारद करण्याची तिच्यात ताकद होती. त्यामुळे इमान पुरुष असल्याची चर्चा तेव्हापासून रंगली होती. आता मेडिकल रिपोर्टमध्ये अल्जिरियाई बॉक्सर महिला नसून पुरुष असल्याचं सिद्ध झालं आहे. रिपोर्टनुसार, इमान खलीफचं शरीर हे पुरषांसारखं आहे. इमान खलिफामध्ये अंतर्गत अंडकोष आणि XY गुणसूत्र आहेत, जे पुरुषांमध्ये आढळतात. इमानचे वैद्यकीय अहवाल 5-अल्फा रिडक्टेस विकाराकडे निर्देश करतात, असंही नमूद केलं आहे. पॅरिसमधील क्रेमलिन-बिसेट्रे हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनीही गेल्या वर्षी त्यांच्या अहवालात इमान खलिफाबाबत अनेक खुलासे केले होते. महिला बॉक्सिंगमध्ये इमानने इटलीच्या बॉक्सरला फक्त 46 सेकंदात पराभूत केलं होतं. त्यामुळे तिच्यावर पुरुष असल्याचा आरोप झाला होता. असं असूनही तिने ही स्पर्धा पूर्ण केली आणि सुवर्ण पदकही आपल्या नावावर केलं.
पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तिच्याविरुद्ध लढणाऱ्या महिला बॉक्सर्सनी इमान खलिफ पुरुष असल्याचा आरोप केला होता. आता या खुलाशानंतर इमान खलिफावर काय कारवाई होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इमान खलिफावर कारवाई होण्याची ही काही पहिली वेळ नाही. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी गेल्या वर्षी जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. इमान खलिफबाबत एक रिपोर्ट लीक झाली असून हा रिपोर्ट जून 2023 चा आहे. हा रिपोर्ट पॅरिसच्या क्रेमलिन-बिसेत्रे रुग्णालय आणि अल्झियर्सच्या मोहम्मद लॅमिन डेबाघिन रुग्णालच्याच्या तज्ज्ञांनी तयार केला आहे. हा रिपोर्ट फ्रांसच्या एका पत्रकाराने लीक केला आहे.
Take the Gold back @Olympics This isn’t fair https://t.co/ZO3yJmqdpY
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 5, 2024
दुसरीकडे, या धक्कादायक खुलाशानंतर क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपलं वक्तव्य जाहीर केलं आहे. हरभजनने ट्वीट करून सांगितलं की सुवर्णपदक पुन्हा घेतलं पाहीजे. दुसरीकडे, पुरुष असल्याच्या वादावर इमान खलिफने सांगितलं होतं की, ‘इतर महिलांप्रमाणे मी पण महिला आहे. एक महिला म्हणून जन्माला आली आहे.मी एका महिलेप्रमाणे राहात आहे आणि मी पात्र केलं आहे.’