ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संपूर्ण जग सज्ज झालं आहे. चार वर्षांनी भरणाऱ्या क्रीडाकुंभात 200 हून अधिक देशांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. जवळपास 10,500 खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. भारताकडून 117 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होणार असून 11 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे 16 दिवसात क्रीडाप्रेमींना विविध खेळांची अनुभूती घेता येणार आहे. 26 जुलैला ओपनिंग सेरेमनी असणार आहे. त्यामुळे हा सोहळा याची देहि याची डोळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज आहेत. पण प्रत्येकाला पॅरिसमध्ये जाता येईल असं नाही. तुम्हालाही या स्पर्धेचा रंगारंग कार्यक्रम पाहण्याची इच्छा असेल तर नाराज होऊ नका. घरबसल्या तुम्ही हा सोहळा फ्रीमध्ये पाहू शकता. 26 जुलैला रात्री 11 वाजता हा सोहळा सुरु होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 जुलैपर्यंत रात्री 2 वाजेपर्यंत हा सोहळा असणार आहे. त्यामुळे हा सोहळा कुठे पाहायचा असा प्रश्न पडला असेल, तर पुढे तुम्हाला याची इंत्यभूत माहिती मिळेल.
भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता 26 जुलै2024 रोजी पॅरिस ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनी सुरु होईल. लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी तुम्हाला मोबाईल फोनमध्ये रिलायन्स जिओ कंपनीचा जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करावं लागले. हे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा एपल स्टोरवरून डाउनलोड करू शकता. फोनमध्ये ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यात मोबाईल नंबर टाकला की ॲप सुरु होईल. यानंतर तुम्ही पॅरिस ओपनिंग सोहळा लाईव्ह पाहू शकता. ही सुविधा फ्रीमध्ये असणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. जिओ सिनेमाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून लाईव्ह पाहू शकता. इतकंच काय तर टीव्ही 9 मराठीवर तुम्हाला या प्रत्येक घडामोडींचे अपडेट मिळतील.
पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा ऐतिहासिक आहे कारण उद्घाटन सोहळा स्टेडियमच्या बाहेर होणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. उद्घाटन समारंभाला सुमारे 6 लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. 222000 मोफत तिकिटे, तर 10400 सशुल्क तिकिटे उद्घाटन समारंभासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पॅरिसमध्ये 80 मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. जेणेकरून संपूर्ण शहरातील लोकांना ते पाहता येईल.