भारताच्या निशा दहियाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला आहे. उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने शेवटच्या सेकंदात झालेल्या रोमहर्षक लढतीत तिचा 10-8 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतरही निशाला पदकापर्यंत पोहोचण्याची संधी आहे. कुस्तीच्या नियमांनुसार, जर निशाला पराभूत करणारी कोरियाची कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचली, तर निशाला रेपेचेजमध्ये संधी मिळेल, ज्याद्वारे ती कांस्यपदकापर्यंत पोहोचू शकेल.
भारताच्या निशाने कुस्ती विजयाने केली आहे. निशाने पहिल्या फेरीत युक्रेनच्या कुस्तीपटूचा 6-4 असा पराभव केला. बराच वेळ सामना 4-4 असा बरोबरीत राहिला आणि अखेरच्या सेकंदात गुण मिळवून सामना जिंकला.
लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकल्यानंतर शेवटच्या दोन सेटमध्ये पराभवाचं तोंड पाहिलं. त्यामुळे कांस्य पदकाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकल्यानंतर दुसरा सेट गमावला आहे. त्यामुळे तिसऱ्या सेटचं महत्त्व वाढलं आहे. हा सेट जिंकेल त्याला कांस्य पदक मिळणार आहे.
लक्ष्य सेनने पहिला सेट आपल्या नावावर केला आहे. मलेशियाच्या ली जी जियाला 21-13 ने मात दिली.
कांस्य पदकासाठी लक्ष्य सेनची लढत सुरु झाली आहे. समोर मलेशियाच्या ली जी जिया याचं आव्हान आहे.
भारताने स्कीट नेमबाजीत मोठे यश संपादन केले असून मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याच्या जवळ पोहोचले आहेत. भारतासाठी माहेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग या जोडीने पात्रता फेरीत 146 गुणांसह चौथे स्थान मिळविले. यासह दोघेही कांस्यपदकासाठी पात्र ठरले आहेत. आज संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून भारताची ब्राँझसाठी चीनशी स्पर्धा होणार आहे. सुवर्णपदकासाठी अमेरिका आणि इटली यांच्यात स्पर्धा होणार आहे.
मनिका बत्राने शेवटच्या फेरीतत 3-0 असा दमदार विजय नोंदवत टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत नेले. मनिकाने प्री-क्वार्टर फायनलच्या 5 व्या फेरीत एनिका डायकोनूचा 3-0 असा पराभव केला. अशा प्रकारे भारताने रोमानियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पॅरिस ऑलिम्पिकमधील गोल्फ प्रकारात भारतीय खेळाडूंनी निराशा केली. शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर हे दोघेही चौथ्या फेरीनंतर पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. शुभंकर शर्मा 40व्या तर गगनजीत 45व्या स्थानावर आहे.
भारताने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर महिला टेबल टेनिसच्या 16 फेरीतील तिसरा सामना रोमानियाने जिंकला आहे. चौथ्या सामन्यातही रोमानियाकडे आघाडी आहे.
टेबल टेनिसमधील भारत आणि रोमानिया यांच्यातील सांघिक स्पर्धा सुरू झाली आहे. महिलांच्या या स्पर्धेत भारताकडून श्रीजा अकुला, मनिका बत्रा सहभागी होत आहेत. 16व्या फेरीचा हा सामना दोन्ही संघांमध्ये खेळला जात आहे.
लक्ष्य सेन इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. मलेशियाच्या ली जियाविरुद्ध त्याने कांस्यपदकाचा सामना जिंकल्यास ऑलिम्पिकच्या पुरुषांच्या बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरेल.