पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी नीरज चोप्राने रौप्य पदक मिळवत शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. भालाफेकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. सर्व भारतीयांना नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. परंतु रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं होतं. पण एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे नीरजला त्रास होत असताना देशासाठी तो खेळला. सुवर्ण नाही आलं पण त्याने हा त्रास होत असताना जिंकलेले रौप्य सुवर्णपदकापेक्षाही मोठं आहे.
ऑलिम्पिकपदक विजेता नीरज चोप्रा रौप्यपदक विजेता आहे. नीरजला हर्नियाचा त्रास होत असताना त्याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं. फायनल झाल्यावर नीरजनेही त्याला त्रास होत असल्याचं सांगितलं. मी माझ्या टीमशी बोलेन आणि त्यानुसार सर्जरीबाबत निर्णय घेईल. माझ्यात आणखी क्षमा आहे फक्त मला फिट राहवं लागणार असल्याचं नीरज चोप्राने म्हटलं आहे.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2014 मध्ये रौप्य पदक जिंकले. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यात नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर फेक केली. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. अर्शदने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 फेक करत ऑलिम्पिक विक्रम रचला.
ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यावर आता त्याच्या कोटिंग स्टाफमध्ये बदल होणार आहे. नीरज चोप्राचे सध्याचे प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिट्झ हे आता जास्त दिवस नसणार आहेत. क्लॉस बार्टोनिट्झ 2018 पासून नीरजसोबत वर्षातील काही महिने काम करत होते. नीरज आणि त्यांची टीम स्टाफमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत. यामध्ये चार कांस्य आणि एक रौप्यपदकाचा समावेश आहे. मनु भाकरने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे मिश्र सांघिक कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकलं. तर हॉकी संघाने कांस्यपदक आणि नीरज चोप्राने रौप्यपदक पटकावले.