Swapnil Kusale: पंतप्रधान नरेंद्र मोदींची कांस्य पदक विजेत्या स्वप्निल कुसाळे याच्यासाठी खास पोस्ट, म्हणाले…

| Updated on: Aug 01, 2024 | 4:06 PM

Pm Narendra Modi On Swapnil Kusale: भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या स्वपनिल कुसाळे याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.

Swapnil Kusale: पंतप्रधान नरेंद्र मोदींची कांस्य पदक विजेत्या स्वप्निल कुसाळे याच्यासाठी खास पोस्ट, म्हणाले...
Swapnil Kusale bronze medal
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आली आहे. स्वप्निलने महाराष्ट्रासह भारताची मान पॅरिसमध्ये अभिमानाने उंचावली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरच्या स्वप्निल कुसाळे याने मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांच्यानंतर भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने भारताला पुरुषांच्या 50मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली. त्याची रौप्य पदकाची संधी अवघ्या काही पॉइंट्सने हुकली. मात्र त्यानंतरही स्वप्निलने कांस्य पदक मिळवल्याने साऱ्या भारतात आनंदाची लाट पसरली आहे. स्वप्निल या प्रकारात पदक मिळवून देणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर त्याचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत स्वप्निलचं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट

“स्वप्नील कुसळेची अप्रतिम कामगिरी! स्वप्निलचं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन. त्याची कामगिरी विशेष आहे. कारण त्याने कौशल्य दाखवले आहे. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदाने भरलेला आहे”, अशा शब्दात पंतप्रधानांनी स्वप्निलचं अभिनंदन केलं आहे.

गृहमंत्र्यांकडून तोंडभरून कौतुक

पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाह यांनीही स्वप्निलचं अभिनंदन केलंय. “कांस्य पदक जिंकल्याबद्दल तुझा अभिमान वाटतो. क्रीडा क्षेत्रातील आव्हानं स्वीकारण्यासाठी लाखो लोकांसाठी तुझा विजय हा प्रेरणादायी असणार आहे. असाच जिंकत राहा”, अशा शब्दात गृहमंत्र्यांनी स्वप्निलचं तोंडभरुन कौतुक केलंय.