महिला नेमबाज मनू भाकर हीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं.भारताला पहिलं पदक हे नेमबाजीतून मिळालं. मात्र भारताचं तिसऱ्या दिवशी पदकाचं खातं रिकामंच राहिलं. मात्र मनूनेच भारताला सरबज्योत सिंह याच्यासह दुसरं पदक मिळवून दिलं. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंह या जोडीने 10 मीटर मिश्र दुहेरीत भारताला कांस्य पदक जिंकून दिलं. भारताचं हे एकूण तसेच दुसरं कांस्य पदक ठरलं. मनूने पहिलंवहिलं कांस्य मिळवून दिल्याने ती भारतातील घराघरात पोहचली. मात्र आता दुसऱ्या पदकामुळे भारतीयांना सरबज्योत सिंह नक्की कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय? असे प्रश्न पडले आहेत. आपण सरबज्योत याच्याबाबत जाणून घेऊयात.
सरबज्योत सिंह याने आपल्या ऑलिम्पिक पदार्पणात वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पदक मिळवून शानदार सुरुवा केली. सरबज्योत सिंहचा जन्म 30 सप्टेंबर 2001 रोजी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. सरबज्योतचा लहानपणापासूनच खेळाकडे ओढा होता. त्याला फुटबॉलर व्हायचं होतं. मात्र सरबज्यातने लहानपणी काही खेळाडूंना एअर गनने सराव करताना पाहिलं. हा सरबज्योतच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. सरबज्योतने इथूनच नेमबाजीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सरबज्योतने वयाच्या 13 व्या वर्षापासून नेमबाजीला सुरुवात केली.
सरबज्योतने अंबाला येथील एआर अकादमी ऑफ शूटिंग स्पोर्ट्समधून सरावाला सुरुवात केली. सरबजीतचे वडील हेच त्याचे रोल मॉडेल आहेत. मात्र सरबज्योत त्याच्या इथवरच्या साऱ्या यशाचं श्रेय हे त्याचा मित्र आदित्य मालरा याला देतो. “आदित्य माझ्यासोबत नेमबाजीच्या पहिल्या दिवसापासून आहे. तसेच आदित्यने मला प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहित केलं आहे”, असं सरबज्योत याने सांगितलं.
भारताच्या खात्यात दुसरं कांस्य पदक
Bronze for team India in the 10m Air Pistol Mixed Team match!
Manu and Sarabjot with some fantastic shooting to land India’s second medal of the #Paris2024Olympics! pic.twitter.com/WhFPY7mNa7
— SAI Media (@Media_SAI) July 30, 2024
सरबज्योतने कोरियातील चांगवोनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई शूटिंग 2023 चॅम्पियनशीप स्पर्धेत डबल धमाका केला होता. सरबज्योतने तेव्हा 2 मेडल्स मिळवून भारताचं नावं उंचावलं. सरबज्योतने तेव्हा 10 मीटर एअर पिस्टल मिश्र स्पर्धेत रौप्य आणि मेन्स 10 मीटरमध्ये कांस्य पदक मिळवलं. सरबज्योतला याच कामगिरीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करण्यात यश मिळवता आलं.