पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रतेप्रकरणी अपडेट समोर आली आहे. फोगाट अपात्रतेप्रकरणी 10 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी निर्णय अपेक्षित होता. या निर्णयाकडे साऱ्या भारतीयांचं लक्ष लागून होतं. मात्र आज निर्णय येणार नाही. याबाबतचा निर्णय हा राखून ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणातील निकाल हा रविवारी 11 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजता येणार आहे. डॉ. एनाबेले बेनेट एसी एससी या विनेश फोगाट प्रकरणाचा निकाल देणार आहेत. विनेश फोगाट हीचं अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचं स्पष्ट झाल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर विनेशने क्रीडा लवादात धाव घेतली होती. त्यानंतर विनेशने क्रीडा लवादात धाव घेतली होती.
विनेश फोगाट हीने तिला अपात्र ठरवल्यांनतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये धाव घेतली. त्यानंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये तब्बल 3 तास युक्तीवाद चालला. विनेश फोगाट या सुनावणीत व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे उपस्थित राहिली. तर हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या दोघांनी युक्तीवाद केला. त्यानंतर आता 10 ऑगस्ट रोजी निकाल अपेक्षित होता. मात्र क्रीडा लवादाला या निर्णयासाठी वाढीव वेळ हवा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय रविवारी येणार आहे. वाढीव वेळ घेतल्याने विनेशला पदक मिळणार, असा याचा अर्थ काढला जात आहे.
दरम्यान विनेशने कोणतीही फसवणूक केलेली नाही. खेळाडूंना आपल्या शरीराची काळजी घेण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. तब्येतीसाठी पौष्टीक पदार्थ घेणं हा सुद्धा अधिकार आहे. विनेशचं पहिल्या दिवशी वजन हे मर्यादापेक्षा कमी होतं. 100 ग्रॅम वजन वाढणं हा शारिरीक प्रक्रियेचा भाग आहे”, असा युक्तीवाद विनेशची बाजू मांडताना करण्यात आला.
दरम्यान भारताने आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 पदकं जिंकली आहेत. त्यामध्ये 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक आहे. नीरज चोप्रा याने भारताला भालाफेकीत हे एकमेव रौप्य पदक मिळवून दिलं. आता क्रीडा लवादाने विनेशच्या बाजूने निर्णय दिल्यास भारताला आणखी एक पदक तेही रौप्य मिळेल. अशाप्रकारे भारताच्या खात्यात एकूण 7 तर दुसरं रौप्य पदक येईल. भारत यासह टोक्योनंतर पॅरिसमध्येही 7 पदकं मिळवण्यात यशस्वी होईल.