पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांची मन की बात, गोल्ड मेडलिस्ट हरविंदरने दिलं असं गिफ्ट

| Updated on: Sep 12, 2024 | 5:26 PM

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय एथलीट्सने जबरदस्त कामगिरी केली. यंदा भारताने 80 खेळाडूंचा चमू पॅरिसला पाठवला होता. भारताने या स्पर्धेत एकूण 29 पदकं जिंकली आहेत. भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांची मन की बात, गोल्ड मेडलिस्ट हरविंदरने दिलं असं गिफ्ट
Image Credit source: PTI
Follow us on

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली. भारताच्या पॅरा एथलीट्सने या स्पर्धेत एकूण 29 पदकं जिंकली आहेत. तसेच आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 8 सप्टेंबरला संपली आणि सर्व खेळाडू मायदेशी परतले आहेत. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या निवासस्थानी खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. खेळाडूंना प्रोत्साहान देण्यासाठी गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंची भेट घेताना पाहिले गेले आहेत.नुकतीच टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची भेट घेतली होती. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंशी संवाद साधला होता. आता पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधला. खेळाडूंनी स्पर्धेतील अनुभव त्यांच्यासोबत शेअर केले. तसेच या स्पर्धेत ऐतिहासिक गोल्ड मेडल जिंकणाऱ्या हरविंद्र सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बाण’ गिफ्ट म्हणून दिला.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच आर्चरीत गोल्ड मेडल मिळवलं आहे. हरविंदर सिंहने भेटीनंतर सांगितलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त पदक विजेत्या खेळाडूंशी नाही तर स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येकाशी संवाद साधला. तसेच सपोर्ट स्टाफसोबतही चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी सर्वांना प्रोत्साहन दिलं.’ दुसरीकडे, रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या मोना पटेल हीनेही आपलं मन मोकळं केलं. ‘पंतप्रधान मोदी यांनी मुलं आणि कुटुंबाबाबत विचारलं. मला आश्चर्याचा धक्का बसला की मोदींना हे सर्व माहिती होतं.’ सोनम पटेलने सांगितलं की, पदक जिंकलं नसलं तरी पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली आणि पुढच्या स्पर्धेत यशासाठी प्रोत्साहन दिलं.

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताकडून 80 हून अधिक स्पर्धकांनाी भाग घेतला होता. या स्पर्धेत भारताचा हा सर्वात मोठा चमू होता. भारताने या स्पर्धेत 29 पदकं जिंकली. यावेळी भारताने 7 गोल्ड, 9 सिल्व्हर आणि 13 ब्राँझ पदकं मिळवली. टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने 19 पदकं जिंकली होती.