मुंबई : प्रो कबड्डी लीग 2023-24 स्पर्धेच्या साखळी फेरीत पुणेरी पलटण संघाचा जलवा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात पुणेरी पलटण संघाने आपली छाप टाकली आहे. 12 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला. तर दोन सामन्यात विजय अवघ्या काही फरकांनी हुकला. त्यामुळे पराभवातही प्रत्येकी एका गुणांची कमाई केली. पुणेरी पलटण संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे सुपर सिक्समधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. आता उर्वरित 10 सामन्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला की संघाचं स्थान पक्कं होणार आहे. पुण्याचा पुढचा सामना गुजरात जायन्ट्सशी 21 जानेवारीला होणार आहे. तिथपर्यंत गुणतालिकेत बरीच उलथापालथ झालेली असेल.
पुणेरी पलटण विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात पहिला सामना रंगला. हा सामना पुण्याने 37-33 च्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात पुण्याने यु मुंबाला 43-32 च्या फरकराने पराभूत केलं. तिसऱ्या सामन्यात हरयाणा स्टिलर्सने 39-44 च्या फरकाने पुण्याला पराभवाचं पाणी पाजलं. त्यानंतर चौथ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सला 49-19 ने, पाचव्या सान्यात दबंग दिल्लीला 30-23 ने, सहाव्या सामन्यात बंगळुरु बुल्सला 43-18 ने, सातव्या सामन्यात पटणआ पायरेट्सला 46-28 ने, आठव्या सामन्यात तेलुगू टायटन्सला 54-18 ने, नवव्या सामन्यात युपी योध्दाला 31-40 ने, दहाव्या सामन्यात तामिळ थलायवाजला 29-26 ने, अकराव्या गुजरात जायन्ट्सला 37-17 ने पराभूत केलं. बाराव्या सामन्यात जयपूर पिंकने अवघ्या दोन गुणांच्या फरकाने पराभूत केलं. जयपूर पिंक पँथर्सने 36-34 ने पुणेरी पलटणचा पराभव केला.
पुणेरी पलटणला दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण या सामन्यातील पराभवही 7 गुणांपेक्षा कमी फरकाने होता. त्यामुळे प्रत्येक एक गुण मिळाला. दहा सामन्यातील विजयाचे एकूण 50 गुण आणि दोन सामन्यात कमी फरकाने पराभव झाला म्हणून 2 गुण असे मिळून पुणेरी पलटणचे 52 गुण झाले आहे. सध्या पुणेरी पलटण संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.