प्रो कबड्डी सीझन 11 चा लिलाव 15 ऑगस्टला मुंबईमध्ये पार पडला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी आठ खेळाडूंना करोडोंची बोली लागली आहे. यंदाच्या लिलावामध्ये सचिन तन्वर याला सर्वाधिक बोली लागलीय. सचिन याची बेस प्राईज 30 लाख रूपये होती, तो डू और डाय रेडचा स्पेशलिस्ट मानला जातो. तामिळ थलायवासने स्टार रेडर सचिन तन्वरसाठी 2 कोटी 15 लाखांची बोली लावली. हरियाणा स्टीलर्स त्यापाठोपाठ इराणच्या अष्टपैलू मोहम्मदरेझा शादलाउई चियानेहला 2.07 कोटी रुपयांना खरेदी केले. सलग दोन लिलावांमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त रूपयांची बोली लावला जाणारा मोहम्मदरेझा पहिला परदेशी खेळाडू ठरला.
PKL च्या इतिहासात सर्वाधिक रेड पॉइंट मिळवणारा खेळाडू प्रदीप नरवाल याला बेंगळुरू बुल्सने 70 लाख रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी अनुभवी डिफेंडर सुरजीत सिंगला जयपूर पिंक पँथर्सने 60 लाख रुपयांना खरेदी केले. मी ज्या संघासह माझा PKL प्रवास सुरू केला त्या संघात परत जाणे खूप चांगले वाटत आहे आणि मी संघातील युवा खेळाडूंसोबत खेळण्यास उत्सुक असल्याचं प्रदीप नरवाल याने म्हटलं आहे.
सचिन तन्वरला 2.15 कोटी रुपये मिळाले. मोहम्मदरेझा चियानेह शादलौईला हरियाणा स्टीलर्सने 2.07 कोटी रुपयांना विकत घेतले. गुमान सिंगला गुजरात जायंट्सकडून लिलावात 1.97 कोटी रुपये मिळाले. पवन सेहरावतला तेलुगू टायटन्सने 1.725 कोटी रुपयांना विकत घेतले. भरतला 1.30 कोटी रुपये मिळाले. मनिंदर सिंगला 1.15 कोटी रुपये, अजिंक्य पवारला 1.107 कोटी रुपये आणि यू मुंबाने 1.015 कोटींमध्ये सुनील कुमारला खरेदी केलं आहे. बेंगळुरू बुल्सने अजिंक्य पवार आणि दबंग दिल्लीमध्ये सिद्धार्थ देसाई गेला. बंगाल वॉरियर्सने फजल अत्राचली याला 50 लाखांमध्ये विकत घेतले. तर रोहित गुलिया, विश्वनाथ व्ही. हे खेळाडू अनसोल्ड राहिले.
Siddharth ‘Baahubali’ Desai is now dabang 💪
Dabang Delhi K.C. buy him for a whopping price of 26 lacs 🤑#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL #PKLPlayerAuction #PKLAuctionOnStar pic.twitter.com/eHdOJJWEop
— ProKabaddi (@ProKabaddi) August 15, 2024
बंगाल वॉरियर्स : विश्वास एस, नितीन कुमार, महारुद्र गर्जे, सुशील कांब्रेकर, मनिंदर सिंग, श्रेयस उंबरदंड, आदित्य एस शिंदे, मनजीत, दीप कुमार, दीपक अर्जुन शिंदे, यश मलिक, फजल अत्राचली.
बेंगळुरू बुल्स : सुशील, अक्षित, मनजीत, पंकज, अजिंक्य पवार, प्रदीप नरवाल, पोनपार्थिबन सुब्रमण्यन, सौरभ नंदल, आदित्य पोवार, लकी कुमार, पार्टिक, अरुलनंथाबाबू, रोहित कुमार, चंद्रनायक एम.
दबंग दिल्ली: नवीन कुमार, आशु मलिक, मनू, मोहित, सिद्धार्थ सिरिश देसाई, हिम्मत अंतील, आशिष, योगेश, विक्रांत, संदीप, आशिष.
गुजरात जायंट्स : राकेश, पार्टीक दहिया, नितीन, गुमान सिंग, सोंबीर, जितेंद्र यादव, बालाजी डी.
हरियाणा स्टीलर्स: विनय, शिवम पटारे, विशाल तैट, जयसूर्या एनएस, घनश्याम मगर, ज्ञान अभिषेक एस, विकास जाधव, मणिकंदन एन, हरदीप, जयदीप दहिया, राहुल सेठपाल, मोहित नंदल, साहिल, मोहम्मदरेझा शादलौई चियानेह.
जयपूर पिंक पँथर्स : अर्जुन देशवाल, हृतिक शर्मा, अभिजीत मलिक, सोंबीर, अंकुश, अभिषेक केएस, रजा मिरबाघेरी, नितीन कुमार, रौनक सिंग, सुरजीत सिंग.
पाटणा पायरेट्स : कुणाल मेहता, सुधाकर एम, संदीप कुमार, साहिल पाटील, दीपक, अयान, मनीष, अभिनंद सुभाष, नवदीप, शुभम शिंदे, अंकित.
पुणेरी पलटण : पंकज मोहिते, मोहित गोयत, नितीन आर, आकाश शिंदे, आदित्य शिंदे, संकेत सावंत, अबिनेश नादराजन, गौरव खत्री, वैभव कांबळे, दादासो पुजारी, तुषार दत्ताराय आधावडे, मोहित, अस्लम मुस्तफा इनामदार.
तमिळ थलैवाः विशाल चहल, रामकुमार मायांदी, नितीन सिंग, नरेंद्र, धीरज बेलमारे, सचिन तन्वर, एम. अभिषेक, हिमांशू, सागर, आशिष, मोहित, साहिल गुलिया, अनुज गावडे, रौनक, नितेश कुमार.
तेलुगू टायटन्स : चेतन साहू, रोहित, प्रफुल्ल जावरे, ओंकार पाटील, नितीन, अंकित, अजित पवार, सागर, कृष्णा, संजीवी एस, शंकर गदई, पवन सेहरावत, विजय मलिक.
यू मुंबा: शिवम, अजित चौहान, मनजीत, गोकुलकन्नन एम, रिंकू, लोकेश घोसालिया, बिट्टू, सोम्बीर, मुकिलन षणमुगम, सनी, दीपक कुंडू, सुनील कुमार, अमीर मोहम्मद जफरदानेश.
यूपी योद्धा: सुरेंद्र गिल, गगना गौडा, शिवम चौधरी, केशव कुमार, सुमित, आशु सिंग, गंगाराम, जयेश महाजन, हितेश, सचिन, साहुल कुमार, भरत हुड्डा.