क्रीडाप्रेमींना अनेक दिवसांपासून असलेली पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेची प्रतिक्षा अखेर संपली आहे. प्रमुख पाहुणे असलेल्या फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राँ आणि आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी सीन नदीच्या पुलावरुन फ्रान्सचा झेंडा फडकावला. यासह भव्यदिव्य अशा उद्घाटन समारंभाचा श्रीगणेशा झाला. उपस्थितांना सीन नदीवर 100 बोटींमधून जाणाऱ्या विविध देशांच्या 10 हजारांपेक्षा अधिक खेळाडूंना पाहता आलं. खेळाडूंनीही चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. खेळाडूंच्या चेहऱ्यावर आपण देशाचं प्रतिनिधित्व करतोय, याचा वेगळाच आनंद दिसून येत होता. ऑलिम्पिकच्या इतिहासात उद्घाटन समारंभाचं आयोजन स्टेडियमबाहेर करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उद्घाटन समारंभात भारतीय खेळाडू हे पारंपरिक पेहरावात दिसले. भारतीय चमूचं नेतृत्व हे पीव्ही सिंधू आणि शरत कमल या दोघांनी केलं. यासह भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पीव्ही सिंधू आणि शरत कमल या दोघांचं नाव धव्जवाहकांच्या यादीत जोडलं गेलं आहे. सीन नदीत झालेल्या भारताच्या संचलनात एकूण खेळाडूंपैकी 78 जण होते. भारतातून या स्पर्धेत एकूण 117 खेळाडू सहभागी झाले आहेत. या सर्व खेळाडूंकडून मेडल्सची अपेक्षा आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 206 देशांमधील 10 हजार 714 खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यापैकी एकट्या अमेरिकेचे सर्वाधिक 592 खेळाडू आहेत. मात्र त्यानंतरही या संचलनाची सुरुवात करण्याचा मान हा ग्रीसला मिळाला. ग्रीस देशाची बोट सर्वात आधी सीन नदीत आली. यामागचं कारणही तसंच आहे. सर्वात पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन हे याच ग्रीस (अथेन्स) येथे करण्यात आलं होतं. त्यामुळे पहिला मान हा ग्रीसला देण्यात आला.
पीव्ही सिंधू-शरतकडून भारतीय चमूचं नेतृत्व
Those smiles carry the dreams and aspirations for glory 🥇of a billion Indians 🫡🇮🇳
The Indian contingent has arrived officially at the #OpeningCeremony of #Paris2024! 😍#OlympicsOnJioCinema #OlympicsOnSports18 #JioCinemaSports #Cheer4Bharat pic.twitter.com/madpvuv9zA
— JioCinema (@JioCinema) July 26, 2024
खेळाडूंसह प्रसिद्ध गायिका ग्रॅमी पुरस्कार विजेती लेडी गागा हीने आपल्या कलाकृतीने उपस्थितीतांचं लक्ष वेधून घेतलं आणि उद्घाटन समारंभाची शोभा वाढवली. तसेच लेडी गागाने गाण्यासह डान्सही केला. तसेच माउलिन राउगच्या 80 कलाकारांनी गुलाबही ड्रेसमध्ये अप्रतिम नृत्य सादर केलं. हे नृत्य 1820 पासून केलं जात आहे.