नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद (Maharashtra Kustigir Parishad) बरखास्त करण्यात आली होती. महाराष्ट्रात सत्तापालट झाली. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असं शिंदे गट आणि भाजपचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या हलचालींकडे बघितलं जातंय. राजकीय दृष्टीकोणातून यासगळ्यांकडे बघितली जातंय. आता याच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) मैदानात आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी खासदार तडस आज उमेदवारी अर्ज भरत आहेत. कधीकाळी शरद पवार यांचं प्राबल्य असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचा हा पहिला प्रयत्न आहे, अशीही चर्चा रंगलीय आहे.
भाजप खासदार बृजभुषण सिंग (bjp mp brijbhushan singh) हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तर विनोद तोमर हे सचिव आहेत. बृजभुषण सिंग यांनी अध्यक्षांच्या बरखास्तीची कारवाई त्यावेळी केली होती. त्यामुळे तो शरद पवार यांना धक्का दिल्याचं बोललं जात होतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष त्यावेळी होते तर बाबासाहेब लांडगे हे 40 वर्षांहून अधिक काळ सचिव. यावरुन वेगळीच चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती.
2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेघे कुटुंबीयानं भाजपमध्ये प्रवेश केला होता.
या परिषदांमध्ये राजकारण होत असल्याची मागे चर्चा होती. त्यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते की,’ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा मी अध्यक्ष आहे. राष्ट्रीय, राज्य स्पर्धांचे आयोजन करणे हे माझे काम आहे. मी त्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेवर गेलो होते. क्रीडा संघटनांना मैदान मिळणे कठीण असते. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला खासगी किंवा सरकारी मदत मिळवून देणे हे माझे आहे. मी कधीही अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला नाही. राहुल आवारे, अभिजीत कटके, उत्कर्ष काळे, किरण भगत यांना मी मदत केली. अनेक खेळाडूंना वैद्यकिय किंवा आर्थिक मदत मी केली आहे. आयुष्यात मी पहिल्यांदा खेळाडूंना जाहीर केलेल्या मदतीबाबत सांगितले आहे. कोणत्याही राज्यातील कुस्तीगीर परिषदेबाबात तक्रारी असतील तर त्याबाबत निर्णय घेणे राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला टाळता येत नाही.’