नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या (Technology) मदतीनं सध्या सर्वकाही शक्य आहे. आजकाल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणतंही काम करता येऊ शकतं. रोबोट हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सध्याचं युग तंत्रज्ञानाचं असल्यानं त्याचा वापरही वाढला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक खेळ प्रगत झाला आहे. त्यामध्ये यंत्रांचा हस्तक्षेप देखील वाढत आहे. क्रिकेट असो, इतर कोणताही खेळ असो, सर्वत्र यंत्रांचा वापर वाढला आहे. सरावाच्या वेळी, गोलंदाज नसला तरी चालेल, कारण अनेक प्रकारची प्रगत गोलंदाजी मशीन उपलब्ध आहेत आणि त्यांना यॉर्कर्स, शॉर्ट पिच किंवा बाऊन्सरसाठी ठराविक गतीने सेट करता येते. असाच बदल बुद्धिबळातही (chess) पाहायला मिळत आहे. तुमचा जोडीदार नसल्यास बोर्डवरील रोबोट (Robot) तुमच्यासोबत गेम खेळू शकतो. हो, हे खरं आहे. पण, याच तंत्रज्ञनाचा उपयोग एका चिमुकल्याला महागात पडला आहे. त्यामुळे त्याला दुखापतही झाली आहे. नेमकं काय झालं, जाणून घ्या…
तंत्रज्ञानातील बदल किती घातक ठरू शकतो, याचं उदाहरण एका रोबोटनं 7 वर्षांच्या मुलाचं बोट तोडले तेव्हा पाहायला मिळालं. ही वेदनादायक घटना रशियातील एका स्पर्धेदरम्यानची आहे. बुद्धीबळ खेळताना रोबोटने मुलाला गंभीर जखमी केले. रिपोर्टनुसार, रोबोटनं मुलाचं बोट तोडलं. मॉस्कोमध्ये मॉस्को चेस ओपनमध्ये मुले रोबोट्ससोबत बुद्धिबळ खेळत आहेत. यामध्ये टेबलावर खेळणाऱ्या रोबोटने बसलेल्या मुलाचे बोट पकडले. बराच वेळ दाबून ठेवले. या क्षणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. रोबोटनं मुलाचे बोट 17 सेकंद धरल्याचं स्पष्टपणे दिसून येते. मूल वेदनेनं रडताना दिसत आहे. आजूबाजूला असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि कसंतरी मुलाचं बोट रोबोटच्या हातातून काढलं. पण, यामुळे त्या चिमुकल्याला मोठा त्रास सहन करावा लागलाय.
All acquisition that advanced AI will destroy humanity is false. Not the powerful AI or breaching laws of robotics will destroy humanity, but engineers with both left hands :/
On video – a chess robot breaks a kid’s finger at Moscow Chess Open today. pic.twitter.com/bIGIbHztar
— Pavel Osadchuk ??? (@xakpc) July 21, 2022
मुलाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संदर्भात आयोजकांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं निवेदन प्रसिद्धीस दिले. हा रोबोट भाड्यानं घेतला होता. यात आयोजकांचा दोष नाही. दुसरीकडे मुलाचे पालक आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत मुलगा त्याच्या घरी सुखरुप असेल अशी आशा आहे.
दरम्यान, हा घडलेला धक्कादायक प्रकार गंभीर असून लहान मुल असताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा धक्कादायक आहे. आता याप्रकरणी काय कारवाई केली जाते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.