World Cup 2025 : खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी सलामी, नेपाळला 42-37 ने नमवलं

| Updated on: Jan 13, 2025 | 10:41 PM

खो खो वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि नेपाळ यांच्यात रंगला. हा सामना भारताने 42-37 असा जिंकला. अतितटीच्या सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत उत्सुकता वाढली होती. पण टीम इंडियाने बाजी मारली.

World Cup 2025 : खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी सलामी, नेपाळला 42-37 ने नमवलं
Follow us on

खो खो विश्वचषक 2025 मध्ये भारत विरुद्ध नेपाळ सामना नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर पार पडला.खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सलामी दिली. भारताचा पहिलाच सामना नेपाळशी रंगला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावातच मोठी आघाडी घेतली होती. भारताला अटॅक करण्याची संधी मिळाली होती. भारताने पहिल्या डावात 24 गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या डावात जेव्हा नेपाळ संघ अटॅक करण्यासाठी आला. तेव्हा भारताने जबरदस्त पद्धतीने झुंजवलं. नेपाळने आपल्या डावात 20 जणांना बाद करण्यात यश मिळवलं. पण भारताने 4 गुणांची आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या डावात बचावत्मक पवित्र्यात असलेल्या नेपाळने कमबॅक केलं. टीम इंडियाला फक्त 18 जणांना बाद करता आलं. तर नेपाळला चांगल्या डिफेंससाठी एक गुण मिळाला. तिसऱ्या डावानंतर भारताकडे 21 गुण होते. नेपाळला हा सामना जिंकायचा तर 22 जणांना बाद करणं आवश्यक होतं. पण चौथ्या डावात टीम इंडियाचे खेळाडू भारी पडले. दुसऱ्या बॅचने नेपाळला चांगलंच झुंजवलं. त्यामुळे एकीकडे वेळ कापरासारखा उडत होता. दुसरीकडे नेपाळचे खेळाडू एक एक खेळाडू बाद करण्यासाठी प्रयत्न करत होता. अखेर नेपाळला फक्त 16 गुण मिळता आले. एकूण भारताचे 42 आणि नेपाळचे 37 गुण होते. भारताने हा सामना पाच गुणांनी जिंकला.

भारताच्या शिव पोथीर रेड्डी याला बेस्ट अटॅकिंगसाठी पुरस्कार देण्यात आला. तर नेपाळच्या रोहितकुमार वर्माला सर्वोत्तम डिफेंसाठी सामन्यानंतर गौरविण्यात आलं आहे. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला आदित्य गणपुले याने.. त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार होता. पण व्हिसाच्या समस्येमुळे पाकिस्तान संघ भारतात पोहोचू शकला नाही. त्यामुळे भारताचा सामना नेपाळसोबत आयोजित केला गेला. अ गटात नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतान भारतासोबत असून प्रत्येकी एक सामना खेळतील. उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी अव्वल दोन स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारत: प्रतीक वाईकर (कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो, सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिव पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी., आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग

नेपाळ: हेमराज पनेरू (कर्णधार), जनक चंद, समीर चंद, बिश्वास चौधरी, सूरज पुजारा, रोहित कुमार वर्मा, यमन पुरी, बेड बहादूर वली, झलक बीके, बिकराल सिंग रतगैया, बिशाल थारू, राजन बल, जोगेंद्र राणा, भरत सारू, गणेश बिश्वकर्मा