पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतीयांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महिला पैलवान विनेश फोगाट हीने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टकडे (CAS) तिला संयुक्तरित्या रौप्य पदक विजेता जाहीर करावं, अशा विनंतीची याचिका दाखल केली आहे. इतकंच नाही तर सुवर्ण पदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही तिने केली. मात्र सीएएसने सुवर्ण पदकाच्या सामन्याची विनंती फेटाळली आहे. त्यामुळे आता सीएएसकडून विनेशच्या संयुक्त रौप्य पदकाच्या विनंतीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे साऱ्या भारतीयांचं लक्ष असणार आहे. सीएएसने विनेशच्या बाजूने निर्णय दिल्यास तिला रौप्य पदक मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार विनेशच्या रौप्य पदकाच्या विनंतीवर 8 ऑगस्ट रोजी निर्णय देण्यात येणार आहे.
महिला पैलवान विनेश फोगाट हीने 6 ऑगस्ट रोजी 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारुन रौप्य पदक निश्चित केलं होतं. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी तिचा सुवर्ण पदकासाठीचा सामना होणार होता. मात्र त्याआधी विनेशचं वजन 100 ग्राम जास्त असल्याचं निदर्शनात आलं. त्यामुळे विनेशला अपात्र करण्यात आलं. त्यामुळे विनेशला रौप्य पदक मिळणार नसल्याचं सोबतच अंतिम फेरीसाठी अपात्र करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.
त्यानंतर आता विनेशने या निर्णयाला आव्हान देत सीएएसकडे याचिका दाखल केली आहे. विनेशने याचिकेद्वारे केलेल्या विनंतीला उत्तर देताना सीएएसने आम्ही सुवर्ण पदकाचा सामना थांबवू शकत नसल्याचं म्हटलं. त्यानंतर विनेशने संयुक्त रौप्य पदकासाठीची याचिका केली आहे. त्यामुळे सीएएसने आता विनेशच्या बाजूने निर्णय द्यावा, अशी साऱ्या भारतीयांना आशा आहे.
विनेशची क्रीडा न्यायालयात धाव
STORY | Vinesh appeals against Olympic disqualification in CAS
READ: https://t.co/d6qblOUNnz pic.twitter.com/ipaZvvFo2g
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2024
खेळाडूंच्या तक्रारी-समस्यांचं निराकरण करण्यासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टची स्थापना करण्यात आली आहे. काही खेळाडूंची ही त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना असते. अशावेळेस संबंधित खेळाडू हे सीएएसकडे दाद मागू शकतात.