पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्व भारतीयांच्या मनाला खोलवर जखम झाली आहे. भारताची वाघिण विनेश फोगाटने 50 किलो वजन गटामध्ये फायनलमध्ये धडक मारली. पण वजन जास्त झाल्याने तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं. भारताचं रौप्य पदक निश्चित झालं होतं. सामना झाला असता आणि विनेश फोगाटने जिंकला असता तर सुवर्ण अक्षरात तिच्या कामगिरीची नोंद झाली असती. पण असं काहीच झालं नाही. कारण विनेश फोगाटचे 100 ग्रॅम वजन वाढल्याने तिला अपात्र करण्यात आलं. पैलवानांच्या घरात जन्मलेल्या भारताच्या वाघिणीसोबतचा प्रवास काही सोप्पा राहिलेला नाही. विनेशचा आत्तापर्यंतचा प्रवास जाणून घ्या. हरियाणामध्ये विनेश फोगाटचा जन्म हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील बलाली या गावातील राहणाऱ्या फोगाट घरातील मुलींनी जगभर आपल्या कामगिरीने नाव कमावलं. ‘दंगल’ चित्रपट आला तेव्हा गीता फोगट आणि बबिता फोगाट यांच्याविषयी सर्वांनाच माहिती झाली. अनेकांना अजुनही असेच वाटते की विनेश हीसुद्धा महावीर फोगट यांची मुलगी आहे. फोगट यांच्या कुटुंबामध्ये एकूण सहा भावंडे आहेत. महावीर फोगाट यांना गीता, बबिता, रितू, संगीता आणि भाऊ दुष्यंत...