डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील (KDMC) टेबल टेनिस (Table tennis) खेळणाऱ्या खेळाडूंसाठी डोंबिवली क्रिडा संकुलातील जिम्नॅशियम बिल्डींग जागेत टेबल टेनिस कोर्ट सुरु केले जाणार आहे. येत्या सहा महिन्यात खेळाडूंसाठी हे कोर्ट तयार होणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी दिली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आज क्रिडा संकुलातील टेबल टेनिस कोर्टाच्या जागेची पाहणी केली, क्रिडा संकुलातील जिम्नॅशियम बिल्डींगची जागा पडून आहे.
सध्या या ठिकाणी कोविडचे आरोग्य साहित्य ठेवण्यात आले आहे. या जागेचा वापर नाही. जवळपास पाच हजार चौरस फूटाच्या प्रशस्त जागेत टेबल टेनिस कोर्ट सुरु करण्याची मागणी टेबल टेनिस कोर्ट असोशिएशनने केली होती.कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. कोरोना काळामुळे खेळाडूंच्या खेळावर बंधने होते. कल्याण डोंबिवलीत राज्य आणि देश पातळीवर टेबल टेनिस खेळणा:या खेळाडूंची संख्या जास्त आहे. कल्याण डोंबिवलीत टेबल टेनिस खेळणाऱ्या खेळाडुंची संख्या जवळपास इतकी आहे. या खेळाडूंना खाजगी जिमखान्यात फि भरुन सराव करावा लागतो. त्यांचा पैसा आणि वेळ खर्च होतो.
काही खेळाडू तर मुंबईला सराव करण्यासाठी जातात. ही खेळाडूंची अडचण लक्षात घेता. त्यांच्याकरीता क्रीडा संकुलात टेबल टेनिस कोर्ट सुरु करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. त्यांनी या मागणीचा विचार करुन जिम्नॅशियम इमारतीच्या जागेत टेबल टेनिस कोर्ट उभारण्यास मंजूरी दिली आहे. आयुक्तांनी या कामाची वर्क ऑर्डरही काढली आहे. या कामावर 25 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. येत्या सहा महिन्यात हे काम मार्गी लागणार आहे. त्यानंतर टेबल टेनिस खेळाडू या कोर्टचा मोफत लाभ घेऊ शकतात.
Within six months table tennis court will start In Dombivali sports complex