मुंबई : गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नीरज चोप्रा याने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये गोल्ड जिंकत त्याने इतिहास रचलाय. पठ्ठ्याने डोळे झाकून देशासाठी आणखी एक गोल्ड मेडल जिंकलं आहे. सर्व जगभरात त्याचं कौतुक होत असलेलं पाहायला मिळत आहे. अशातच नीरज याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरज याने पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीम याला फोटो काढण्यासाठी बोलावलं. नीरज याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहाला मिळत आहे. भारत-पाक एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने कोणत्याही खेळात दोन्ही देशांमध्ये अटीतटीची लढाई होताना दिसते. नीरज आणि अरशद यांच्यामध्येही झुंज पाहायला मिळाली यामध्ये नीरजने आपली सर्व ताकद लावत गोल्ड मेडलला गवसणी घातली.
1. Pakistanis tweeting 10x about lack of facilities should have tweeted atleast once way before.
2. Arshad Nadeem had world class training in Germany just like Neeraj.
3. Enjoy Neeraj Chopra inviting Arshad under 🇮🇳 as he didn’t have 🇵🇰#NeerajChoprapic.twitter.com/wqRxCACMIC
— Johns (@JohnyBravo183) August 27, 2023
नीरज वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं. नीरज यासह एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसराच भालाफेकपटू ठरला आहे.
दरम्यान, नीरज चोप्रा देशभरातील तरूणांसाठी आदर्श मानला जाईल. आताची तरूणाई व्यसनाच्या आधीन गेलेली दिसते. मात्र आपल्या नीरजला गोल्ड मेडल जिंकायची नशा आहे. देशाला नीरज चोप्राचा अभिमान आहे.