मुंबई : भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांना मृत्यू झाला. (Bhandara Government District Hospital Fire) मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांना मृत्यू झाला. या घटनेवर देशभरातील नागरिकांनी शोक प्रतिक्रिया दिल्या. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरनेही (Pak Shoaib akhtar) या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. घडलेल्या घटनेबद्दल त्याने तीव्र दु:ख व्यक्त केलंय. (Pak Shoaib akhtar tweet on Bhandara District hospital fire)
“शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांना मृत्यू झाल्याची घटना खूपच धक्कादायक आणि दु:खद आहे. पहाटेच्या सुमारास आगीत 10 बाळांना मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलंय. दु:खद घटना”……, असं ट्विट शोएब अख्तरने केलं आहे.
Very very sad news ??newborn babies died after fire broke out in the Special Newborn Care Unit of a hospital in Maharashtra in the early hours of Saturday, doctors said
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) January 9, 2021
शोएबच्या ट्विटरवर अनेक पाकिस्तानी नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. शोएबने जसं या घटनेप्रति दु:ख व्यक्त केलं तसंच दु:ख अनेक पाकिस्तानी नागरिकांनीही व्यक्त केलंय. शोएबच्या ट्विटवर अनेकांनी संवेदना जागवणारे तसंच भावनिक मेसेज केले आहेत.
May Allah ease the pain of parents.
— Waqas Riaz (@WaqasRiaz7) January 9, 2021
Yes sad news indeed. Allah unkay walidain ko sabr aata karay, buhat bara gham hy un k liyay.
Laikin quetta k hazara walon k galay katnay par sad nahi hua hamara rawalpindi express. Is baat lar b afsos— Yunis_hasan (@Yunishasan4) January 9, 2021
Sad news
— Razibul Rajib (@RajibRazibul) January 9, 2021
Too sad
— Mian Imran Rahim (@mianimranrahim1) January 9, 2021
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना जागवल्या.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
(Pak Shoaib akhtar tweet on Bhandara District hospital fire)
संबंधित बातम्या
Bhandara District hospital fire | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली
भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह