मुंबई : इंग्लंडची (ENG) टीम पाकिस्तान (PAK) दौऱ्यावर आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सध्या रावळपिंडीच्या (Rawalpindi) मैदानात कसोटी सामना सुरु आहे. काल इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची घरच्या मैदानात जोरदार धुलाई केली. त्यामुळे इंग्लंडचे सगळ्या फलंदाजांचं चाहत्यांनी कौतुक केल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कालच्या सामन्या दरम्यान पाकिस्तानची एक महिला फॅन टेरेसवर नाचत असल्याची पाहायला मिळाली आहे.
ज्यावेळी इंग्लंडचे फलंदाज चांगली फलंदाजी करीत होते. त्यावेळी एक महिला टेरेसवर काहीतरी करीत असल्याचं कॅमेरामॅनच्या लक्षात आलं. ज्यावेळी तो कॅमेरा तिच्यापर्यंत गेला. त्यावेळी ती एका गाण्यावर डान्स करीत असल्याचे सगळ्यांनी पाहिले. विशेष ती महिला कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिला नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इंग्लंडच्या चार फलंदाजांनी काल शतक लगावले. त्यामुळे इंग्लंडची धावसंख्या पहिल्या दिवशी 500 च्या वरती होती. पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केल्यामुळे सोशल मीडियावर गोलंदाजांची अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.
Beautiful scenes #EnglandvsPakistan #PAKvENG #englandcricket pic.twitter.com/FLtCH9mzQB
— Dz shamrat pradhan (@DzShamrat) December 1, 2022
ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या टीमने पाकिस्तानच्या टीमचा पराभव केला आहे. इंग्लंडची टीम सध्या मजबूत स्थितीत असून खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत.