नवी दिल्ली : पाकिस्तानचा युवा खेळाडू बाबर आझमने (Babar Azam) पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पछाडलं आहे. बाबर आझमने पुन्हा विराटचा खास विक्रम मोडला आहे. बाबरने टी ट्वेन्टी इंटनॅशनल क्रिकेटमध्ये वेगवान 2000 रन्स पूर्ण केले आहेत. केवळ 52 डावांमध्ये बाबर आझमने हा विक्रम केला आहे. विराटने हा कारनामा 56 डावांमध्ये केला होता. विराटचा हाच विक्रम बाबर आझमने मोडित काढला आहे. (Pak vs Zim babar Azam Complete Fastest 2000 Runs t20 Break Virat kohli record)
बाबर आझम टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये वेगवान 2000 रन्स करणारा बॅट्समन बनला आहे. विराट कोहलीने 56 डावांमध्ये 200 रन्स करण्याची कामगिरी केली होती. बाबरने एक पाऊल पुढे टाकत 52 डावांमध्ये अशी किमया केली आहे.
Babar Azam becomes the fastest batsman to 2000 T20I runs ?
He has taken only 52 innings to achieve the feat!#ZIMvPAK pic.twitter.com/cJT2HkYScg
— ICC (@ICC) April 25, 2021
कमी डावांमध्ये वेगवान 2000 धावा पूर्ण करण्यात बाबरने सगळ्यांना मागे टाकलं आहे. विराटच्या 56 डावांचा विक्रम मोडित काढत बाबरने 52 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.
बाबर आझम (52 डाव)- पाकिस्तान
विराट कोहली (56 डाव)-भारत
अॅरोन फिंच (62 डाव)-ऑस्ट्रेलिया
ब्रँडन मॅक्युलम (66 डाव)- न्यूझीलंड
मार्टिन गप्टिल (68 डाव)- न्यूझीलंड
झिम्बावेविरोधात हरारे येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी ट्वेन्टीमध्ये पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने 46 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार लगावले. या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 165 धावा केल्या.
पाकिस्तानमध्ये बाबरची तुलना नेहमी विराट कोहलीशी होते. विराटचा विक्रम मोडल्यानंतर बाबरवर पाकिस्तानमधून स्तुतीसुमनांचा वर्षाव होतोय. पाकिस्तानी खेळाडूंनी बाबरला खास शुभेच्छा दिल्या आहेत. इंजमाम उल हक, शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर यांनी बाबरचं अभिनंदन केलं आहे.
(Pak vs Zim babar Azam Complete Fastest 2000 Runs t20 Break Virat kohli record)
हे ही वाचा :
IPL 2021 : चेन्नई संघासाठी आणि चाहत्यांसाठी दु:खद बातमी, अध्यक्ष एल सबारत्नम यांचं निधन
IPL 2021 : सर जाडेजाच्या बहारदार बॅटिंगला साक्षीचा सलाम, पोस्ट शेअर करत म्हणाली…
IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’
IPL 2021 : ‘जिसे डरते थे, वहीं बात हो गयी’, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला ‘डबल धक्का’!