Pakistan Cricketer Corona | सलामीवीर, मधली फळी, तळाचे फलंदाज कोरोनाच्या कचाट्यात, पाकचे 10 खेळाडू पॉझिटिव्ह

| Updated on: Jun 23, 2020 | 8:43 PM

गेल्या 24 तासात पाकिस्तानच्या 10 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी (22 जून) तीन खेळाडूंना कोरोना झाल्याची माहिती होती.

Pakistan Cricketer Corona | सलामीवीर, मधली फळी, तळाचे फलंदाज कोरोनाच्या कचाट्यात, पाकचे 10 खेळाडू पॉझिटिव्ह
Follow us on

इस्लामाबाद : सलामीवीर, मधली फळी, तळाच्या फलंदाजांसह (Pakistan 10 Cricketers tested Corona Positive) पाकिस्तानची निम्यापेक्षा जास्त क्रिकेट टीम कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. गेल्या 24 तासात पाकिस्तानच्या 10 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी (22 जून) तीन खेळाडूंना कोरोना झाल्याची माहिती होती. त्यानंतर आज (23 जून) आणखी 7 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा इंग्लंड दौराच संकटात सापडला आहे (Pakistan 10 Cricketers tested Corona Positive).

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी आणखी सात खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. आज फखर जमां, इमरान खान, काशिभ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिजवान आणि वहाब रियाज या सात खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर काल शादाब खान, हारिस रऊफ आणि हैदर अली यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

इंग्लंड दौऱ्याबाबत साशंकता

पाकिस्तानचा 29 सदस्यीय क्रिकेट संघ 28 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने शनिवारी (20 जून) याबाबत माहिती दिली होती. त्यासाठी 24 जूनला सर्व खेळाडूंना लाहोरमध्ये एकत्रित व्हायचं होतं. येथून संपूर्ण संघ मॅन्चेस्टरसाठी रवाना होणार होती (Pakistan 10 Cricketers tested Corona Positive).

या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचा संघ तीन टी-20 आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे. मात्र, त्याअगोदर संघातील 10 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने या दौऱ्याबाबत साशंकता आहे.

कोरोनाचा क्रिकेटवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे क्रिकेटचे सामनेही रद्द करण्यात आले. यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये होणारा हा क्रिकेटचा पहिलाच सामना असणार आहे. मात्र, त्यावरही आता कोरोनाचं संकट आहे. यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीलाही कोरोनाचा लागण झाली होती.

Pakistan 10 Cricketers tested Corona Positive

संबंधित बातम्या :

Mohammad Irfan’s death rumours | पाक क्रिकेटर मोहम्मद इरफानच्या अपघाती मृत्यूची अफवा

माझ्यासाठी दुआ करा, पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला कोरोना

पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल्ल रझाकचे भारतीय क्रिकेट संघावर गंभीर आरोप