PAK vs AFG : अफगाणिस्तानला हरवलं, पण पाकिस्तानचं भविष्य आता भारताच्या हातात

| Updated on: Jun 29, 2019 | 11:54 PM

विश्वचषकातील तुल्यबळ लढतीत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 3 गडी राखत मात केली आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला 227 धावांचे लक्ष्य दिले होते. याचा पाठलाग करताना पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 3 गडी राखत 230 धावा करत विजय मिळवला

PAK vs AFG : अफगाणिस्तानला हरवलं, पण पाकिस्तानचं भविष्य आता भारताच्या हातात
Follow us on

लंडन : विश्वचषकातील तुल्यबळ लढतीत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 3 गडी राखत मात केली आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला 227 धावांचे लक्ष्य दिले होते. याचा पाठलाग करताना पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 3 गडी राखून 230 धावा करत विजय मिळवला. अखेरच्या षटकात 3 चेंडू 2 धावा अशी स्थिती असताना इमाद वसिमने अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीने नेबच्या चेंडूवर चौकार मारुन पाकिस्तानला विजय मिळवून दिला. इंग्लंड्च्या हेडिंग्ले मैदानात पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगला. या रंगतदार सामन्यात पाकिस्तान विजयी ठरला असून यामुळे पाकिस्तानाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान अद्याप कायम आहे.

दरम्या अफगाणिस्तानला हरवल्यानंतर आता उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला बांग्लादेशसोबत सामना करावा लागणार आहे. तर दुसरीकडे उद्या (30 जून) भारत विरुद्ध इंग्लंड सामना इंग्लंड हा सामना होणार आहे. भारताने इंग्लंडला हरवल्यानंतर पाकिस्तानची उपांत्य फेरीकडची वाटचाल सुकर होणार आहे.

कारण, इंग्लंड सध्या आठ गुणांसह पाचव्या क्रमांकावर घसरलं आहे, तर पाकिस्तानने 9 गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशही सात गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. पण महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केला आणि पाकिस्तानने बांगलादेशला हरवलं तर पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामना भारतीय चाहत्यांप्रमाणे पाकिस्तानी चाहत्यांसाठीही महत्त्वाचा असणार आहे.

भारत-पाक सेमीफायनल

पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर राहिल्यास भारत विरूद्ध पाकिस्तान सेमीफायनल होण्याची शक्यता आहे. भारत इंग्लंडनंतर बांगलादेश आणि श्रीलंकेसोबत भिडणार आहे. भारताने उर्वरित सर्व सामने जिंकल्यास टीम इंडिया अव्वल क्रमांकावर येईल आणि नियमानुसार पहिल्या आणि चौथ्या संघाचा सेमीफायनल होईल.

दरम्यान आज (29 जून) झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या रहमत शाह आणि कर्णधार गुलबदीन नैब यांनी अफगाणिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर शाहीन आफ्रिदीने नैबचा विकेट घेत अफगाणिस्तानला धक्का दिला. यानंतर मात्र अफगाणिस्तानचे फलंदाजांची खेळी ढासळत गेली. मधल्या फळीत पाकिस्तानच्या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी उतरलेल्या असगर अफगाण, नजिबउल्ला झरदान यांनी चांगली झुंज दिली. मात्र ती झुंज अपयशी ठरली. दरम्यान पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 4, इमाद वासिम आणि वहाब रियाझने प्रत्येकी 2 तर शादाब खानने 1 बळी घेतला.

तर अफगाणिस्तानने दिलेल्या 228 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे शेवटच्या ओवरमध्ये 6 चेंडूत 6 धावांची गरज होती. त्यात पहिल्या दोन चेंडूत इमाद वसिम आणि वाहब रहीज यांनी प्रत्येक एक धाव काढली. तर तिसऱ्या चेंडूत 2 धावा काढल्या. त्यानतंर इमाद वसिमने अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैब याच्या चेंडूवर दणदणीत चौकार ठोकला आणि पाकिस्तानचा विजय मिळवून दिला. दरम्यान या सामन्यात इमाद वसिम याने 54 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली.