इस्लामाबाद : पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याला चार सामन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. मंगळवारी वन डे सामन्यादरम्यान पाकिस्तानी कर्णधार सरफराजने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर अँडिले फेलुकवायो याच्याबद्दल वर्णभेद करणारा शब्द वापरला. अँडिले फेलुकवायो हा दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर आहे.
ऑल राऊंडर अँडिले फेलुकवायो याची सरफराज अहमदने आक्षेपार्ह शब्दात खिल्ली उडवल्याने, त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच सोशल मीडियावरुनही क्रिकेटप्रेमींनी सरफराजवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर सरफराजवर चार महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Pakistan captain Sarfaraz Ahmed suspended for 4 matches after accepting that he was in breach of ICC’s Anti-Racism Code for Participants following the incident where he aimed a comment at South Africa’s Andile Phehlukwayo during 2nd ODI against South Africa on Tuesday. (file pic) pic.twitter.com/r2FbHAPb1x
— ANI (@ANI) January 27, 2019
सरफराज याने झालेल्या घटनेबद्दल ट्वीट केले असून, त्यात त्याने म्हटले आहे की, “आज सकाळी मी अँडिले फेलुकवायो याची माफी मागितली आणि त्यानेही मला माफ केले आहे. मी अपेक्षा करतो की दक्षिण आफ्रिकेची जनताही मला माफ करेल.”
सरफराजने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडर खेळाडू अँडिले फेलुकवायोची भेट घेतली आणि माफी मागितली. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला ‘काळ्या’ असं म्हणाला होता.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरु असताना, विकेट कीपिंग करताना, सरफराजने ‘अबे काले तेरी अम्मी आज कहा बैठी है, क्या पढवा के आया है आज’ असं म्हटले आणि हा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला. किंबहुना, सरफाराजचे हे आक्षेपार्ह विधान ऑन एअरसुद्धा गेले. त्यामुळे सरफराजवर सर्वच स्तरातून टीका सुरु झाली.
दरम्यान, हा सामना दक्षिण आफ्रिका पाच विकेटने विजयी झाली. तर फेलुकवायोला त्याच्या ऑलराऊंडर कामगिरीमुळे ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला.