लाहोर : पाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. 27 वर्षीय आमीरने (Mohammad Amir) कसोटी क्रिकेटला (Test Cricket) अलविदा केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आमीरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आमीरने पाकिस्तानकडून 36 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने तब्बल 119 विकेट्स घेतल्या आहेत.
वन डे क्रिकेटमधील धोकादायक गोलंदाजांपैकी एक असलेल्या आमीरने 59 वन डे सामन्यात 77 विकेट्स आपल्या नावावर जमा केल्या आहेत.
आमीरने 2009 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र मॅचफिक्सिंगमध्ये दोषी आढळून त्याची रवानगी जेलमध्ये झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये आमीरने पुन्हा कसोटी क्रिकेटमधूनच पुनरागमन केलं होतं. पुनरागमनानंतर आमीरला कसोटी क्रिकेटमध्ये छाप सोडण्यात यश आलं नाही. त्या तुलनेत वन डे आणि टी 20 क्रिकेटमध्ये आमीरने जबरदस्त गोलंदाजी केली.
Pakistan Cricket Board (PCB): Fast bowler Mohammad Amir announces retirement from Test Cricket. (File pic) pic.twitter.com/qLpHn6e4kK
— ANI (@ANI) July 26, 2019