मुंबई : पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान (Pakistan vs South Africa) पार पडलेला पहिला एकदिवसीय सामना विशेष चर्चेत आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली लढत… बाबर आझमचा (Babar Azam) खास वेगवान रेकॉर्ड तसंच फहीम अशरफचा (Faheem Ashraf) उडता कॅच…! क्रिकेटच्या मैदानावर आपण सुंदर कॅच पाहत असतो. पण पाकिस्तानच्या फहीम अशरफने हवेत सूर मारत दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचा (Aiden Markram) कॅच घेतला आणि त्याला तंबूत जायला भाग पाडलं. त्याच्या या ‘सुप्पर से भी उप्पर कॅच’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Pakistan Faheem Ashraf Super Catch Against South Africa 1st one Day match)
फहीम अशरफने टिपलेला कॅच एवढा सुंदर होता की आऊट झालेला एडेन मार्कराम केवळ त्याच्याकडे पाहत राहिला. 7 व्या ओव्हरसाठी शाहीन आफ्रिदी गोलंदाजीसाठी आला. त्याच्या चेंडूवर फटका लगावण्याच्या नादात त्याने चुकीचा शॉट खेळला. मीड ऑन वर उभा असलेल्या फहीम अशरफ हवेत सूर मारला आणि झेल टिपला. मार्करामने 23 चेंडूत 19 धावा केल्या. ही खेळी करताना मार्करामला चांगली लय सापडली होती. जर मार्करामचा कॅच फहीमने घेतला नसता तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता.
पाहा व्हिडीओ :
Faheem Ashraf takes superb diving forward catch ?#PAKvSA pic.twitter.com/QEKFjv8Ssg
— Bilal Zafar (@_Bilalzafar) April 2, 2021
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने 103 धावांची शानदार खेळी केली.बाबरने या शतकासह वेगवान 13 शतके करण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाच्या नावावर होता. त्याने 83 डावात हा पराक्रम केला होता. हा पराक्रम पूर्ण करण्यासाठी बाबरने अवघ्या 76 डावांचा सामना केला. दुसरीकडे विराट कोहलीने 86 डावांमध्ये 13 शतके ठोकली आहेत.
या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेसाठी वेन डेर ड्यूसेनने 123 धावांची खेळी केली. याशिवाय डेव्हिड मिलरनेही 50 धावा केल्या. ज्याच्या बळावरदक्षिण आफ्रिकेने 6 गडी गमावून 273 धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे शतक आणि इमाम उल हकच्या 70 धावांनी पाकिस्तानने शेवटच्या बॉलवर हा सामना 3 गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेसाठी, एनिच नॉर्ट्जेने शानदार चार गडी बाद केले, पण त्याचा फायदा त्याच्या संघाला होऊ शकला नाही.
या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिका दौर्यावर पाकिस्तानच्या संघाला 3 एकदिवसीय सामने आणि 4 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.
(Pakistan Faheem Ashraf Super Catch Against South Africa 1st one Day match)
हे ही वाचा :
पाकिस्तानच्या बाबर आझमचा ‘वेगवान’ रेकॉर्ड; विराट कोहली, हाशिम आमलाला टाकलं मागे!