ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 4th Test) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. टीम इंडियाचे अनेख खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. यामुळे या चौथ्या सामन्यात टीम इंडियाची मदार युवा खेळाडूंच्या खांद्यावर आहे. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही या नव्या दमाच्या शिलेदारांनी कांगारुंना आतापर्यंत कडवी झुंज दिली आहे. यावरुन पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (shoaib akhtar) टीम इंडियाची प्रशंसा केली आहे. (pakistan former fast bowler shoaib akhtar appreciate team india young players who playing without senior player)
टीम इंडियाचे अनेक खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे नव्या खेळाडूंसह टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहेत. नवखे खेळाडू असूनही ते ऑस्ट्रेलियाला आव्हान देत आहेत, ही बाब प्रशंसनीय असल्याचं अख्तर म्हणाला. अख्तरने याबाबत आपल्या युट्यूब चॅनेलवर प्रतिक्रिया दिली.
चौथ्या सामन्यासाठी शार्दुल ठाकूर आणि थंगारासू नटराजनला खेळण्याची संधी मिळाली. आपल्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याी संधी मिळेल, अशी कल्पनाही या दोघांनी केली नसेल, असं अख्तरने म्हटलं. ऑस्ट्रेलिया स्पेशालिस्ट खेळाडूंसह मैदानात उतरली आहे. पण टीम इंडिया आपल्या मोजक्याच नियमित खेळाडूंसह खेळत आहे. अर्थात अर्ध्या खेळाडूंसह खेळेतेय. तरीही ऑस्ट्रेलियाला झुंज देतेय. तसेच त्यांच्यावर वरचढ ठरत असल्याचं अख्तरने नमूद केलं.
टीम इंडियाचे अनेक खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. मात्र सुदैवाने रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला कोणतीही दुखापत झालेली नाही. जर ही मालिका जिंकली तर टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमधील ऐतिहासिक विजय असेल, असंही अख्तरने म्हटलं.
चौथ्या दिवसाचा टी ब्रेकनंतरचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबला आहे. तोवर ऑस्ट्रेलियाने 7 बाद 243 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने 276 धावांची आघाडी घेतली आहे. पावसानंतर खेळ सुरु झाल्यावर टीम इंडियाने कांगारुंना लवकर गुंडाळल्यास सामना आणखी रंगतदार होऊ शकतो. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
Aus vs Ind 4th Test | चिडखोर कांगारु ! “बॅटिंगदरम्यान ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते”
(pakistan former fast bowler shoaib akhtar appreciate team india young players who playing without senior player)