अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच निकाली निघाला. भारताने पाहुण्या इंग्लंडवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवल मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने इंग्लंड टीमसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही खेळपट्टी खेळण्याच्या लायकीची नसल्याचं, अनेकांनी म्हटलं. तर या खेळपट्टीवर बंदी टाकण्याचीही मागणी करण्यात आली. त्यात आता पाकिस्तानाच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आपली प्रतिक्रिया दिली आहे. (pakistan former faster bowler shoaib akhtar on ahmedabad pitch)
“अशा पीचवर सामन्याचे आयोजन करुन नये. तसेच टीम इंडिया कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर विजय मिळवू शकते. त्यासाठी टीम इंडियाला टर्न असलेल्या पीचची आवश्यकता नाही. ज्या पीचवर चेंडू टर्न घेतो, अशा खेळपट्टीवर सामना अजिबात खेळवला नाही पाहिजे. अवघ्या 2 दिवसात सामना संपतो. हे टेस्ट क्रिकेटसाठी बरोबर नाही. मायदेशात खेळण्याचा फायदा मी समजू शकतो. पण हे काही झालं ते जरा जास्तच होतं. टीम इंडियाने 400 धावा केल्या. तसेच इंग्लंडने 200 धावा केल्या तर समजू शकतो. पण या तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांची घसरगुंडी झाली”, असं मत अख्तरने आपल्या युट्युब चॅनेलवरुन व्यक्त केलं.
“टीम इंडिया फार मजबूत आहे. भारताला विजय मिळवण्यासाठी अशा प्रकारची खेळपट्टी बनवण्याची आवश्यकता नाही. टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करुन खेळण्याची गरज आहे. टीम इंडियामध्ये इंग्लंडला पराभूत करण्याची क्षमता आहे. भारताला घाबरण्याची आवश्यकता नाही. तसेच डे नाईट सामन्यासाठी अहमदाबाद सारखी खेळपट्टी तयार करण्याचीही गरज नाही. भारतीय संघाने यावर लक्ष देण्याची गरज आहे”, असंही अख्तरने नमूद केलं.
या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या :
(pakistan former faster bowler shoaib akhtar on ahmedabad pitch)