आशिया चषकात (Asia Cup 2022) चांगली कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू (Pakistan Player) सुद्धा पुन्हा चर्चेत आले आहेत. अफगाणिस्तानसोबतच्या सामन्यात अंतिम षटकात सलग दोन षटकार लगावल्याने एक गोलंदाज अधिक व्हायरल झाला होता. त्याची तारिफ सुद्धा अनेकांनी केली. तसेच पाकिस्तानच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर (Social Media)योद्ध्याची भूमिका दिली. परंतु अंतिम सामन्यात श्रीलंका टीमने पाकिस्तान टीमला हरवल्यानंतर पुन्हा पाकिस्तान टीमवरती टीका केली.
आशिया चषकात गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडिया आशिया चषकातून बाहेर पडली. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांवरती सुद्धा सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती.
ऑस्ट्रेलिया टीम विरुद्ध झालेल्या मालिकेत टीम इंडिच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सुर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दीक पांड्या यांची नावे आहेत.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकल्यामुळे विश्वचषकात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याने एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना हार्दिक पांड्यासारखा खेळाडू पाकिस्तानच्या टीममध्ये नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
हार्दीक पांड्यासारखा फिनिशर पाकिस्तानच्या टीममध्ये असायला हवा, तशी भूमिका कोण निभावतंय हे सुद्धा पाहावं लागेल.