VIDEO: पुरामुळे झालेल्या विध्वंसासाठी पाकिस्तान संघ घालणार खास जर्सी

| Updated on: Sep 20, 2022 | 12:52 PM

पूरग्रस्तांना अनेक खेळाडूंनी मदत केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या सेलिब्रिटी आणि उद्योजकांनी सुद्धा मदत केली असल्याचे समजते.

VIDEO: पुरामुळे झालेल्या विध्वंसासाठी पाकिस्तान संघ घालणार खास जर्सी
VIDEO: पुरामुळे झालेल्या विध्वंसासाठी पाकिस्तान संघ घालणार खास जर्सी
Image Credit source: twitter
Follow us on

पाकिस्तानमध्ये (Pakistan) मागच्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक लोकं बेघर झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारने (Government) सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. अनेक लोकांच्या त्यामध्ये मृत्यू सुद्धा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पाकिस्तान देशाचं पुरामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे. अनेक खेळाडूंनी (Player) लोकांना मदत केली आहे.

शाहिद आफ्रीदी आपल्या संस्थेच्या माध्यमातून तिथल्या लोकांना मदत करीत आहे. कारण तिथं परिस्थिती अधिक बिघडली असल्याचे ट्विट पाकिस्तानचा जलगती माजी गोलंदाज शोएब अख्तर याने केलं होतं. तसेच आफ्रिदी संस्थेच्या माध्यमातून चांगलं काम करीत असल्याचे सुद्धा त्याने सांगितले होते.

पूरग्रस्तांना अनेक खेळाडूंनी मदत केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या सेलिब्रिटी आणि उद्योजकांनी सुद्धा मदत केली असल्याचे समजते.

सद्या इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे, आज त्यांची मॅच होणार आहे. आजच्या मॅचमध्ये प्रेक्षकांचे जे काही पैसे असतील ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

आजच्या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू त्यांनी परिधान केलेल्या जर्मीच्या माध्यमातून पूराग्रस्ताबाबत जागृती करणार आहेत. आजच्या सामन्याला अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे अशी विनंती केली आहे.