MS Dhoni : धोनीने विराट कोहलीला कसं वाचवलं? पाकिस्तानी खेळाडूने 11 वर्षांनी ते गुपित सांगितलं..

| Updated on: Jul 03, 2024 | 2:20 PM

क्रिकेटच्या जगात अनेक किस्से होत असतात. काही चांगले असतात तर काही वाईट असतात. कधी एखाद्या खेळाडूचा फॉर्म नसतो म्हणून तो फ्रस्टेशनमध्ये असतो. तर कधी एखाद्या खेळाडूंचे तारे बुलंद असतात. त्यामुळे तो विक्रमावर विक्रम रचत असतो. पण अशा चांगल्या आणि वाईट काळात खेळाडूच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. विराट कोहलीबाबत 11 वर्षापूर्वी असच काही झालं होतं. तेव्हा त्याच्यासाठी धावून आला होता धोनी. काय झालं होतं तेव्हा?

MS Dhoni : धोनीने विराट कोहलीला कसं वाचवलं? पाकिस्तानी खेळाडूने 11 वर्षांनी ते गुपित सांगितलं..
विराट कोहली आणि धोनी
Image Credit source: social media
Follow us on

पाकिस्तानचे अनेक खेळाडू कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचदा हे खेळाडू त्यांच्या बेताल विधानांमुळेही चर्चेत असतात. तर काही खेळाडू त्यांच्या चांगल्या विधानांमुळेही चर्चेत असतात. चांगल्या विधानांमुळे चर्चेत असलेल्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमलचा समावेश होतो. अकमलने एका पाकिस्तानी चॅनेलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मोठा खुलासा केला आहे. त्याने टीम इंडियाचा महान फलंदाज महेंद्रसिंह धोनी सोबत बंद दरवाज्या आड झालेल्या चर्चेचा खुलासा केला आहे. धोनीने 2013मध्ये विराट कोहलीला टीम इंडियातून ड्रॉप होण्यापासून वाचवलं होतं, असा मोठा दावा कामरानने केला आहे. कामरानच्या या विधानाची आता क्रिकेट विश्वात चर्चा सुरू झाली आहे.

कामरान अकमल याने या मुलाखतीत 2013च्या घटनेबाबत माहिती दिली. 2013मध्ये पाकिस्तानी टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. तेव्हा दोन्ही संघा दरम्यान व्हाईट बॉल सीरिज खेळवली गेली होती. त्या दौऱ्यात एक दिवस एमसएस धोनी डिनर करत होता. त्यावेळी सुरेश रैना, युवराज सिंह आणि शोएब मलिकही उपस्थित होते. त्या काळात विराट कोहलीचा खराब फॉर्म सुरू होता. तेव्हा एक मॅनेजर धोनीच्या खोलीत आला. त्याने विराटला वनडेच्या शेवटच्या मॅचमध्ये घेऊ नको म्हणून धोनीला सांगितलं होतं, असं कामरान म्हणाला.

नेमकं काय घडलं?

त्यावेळी धोनी आतूनच भडकला होता. त्याने मॅनेजरला कुत्सितपणे उत्तर दिलं. ठीक आहे. मीही 6 महिन्यांपासून सुट्टी घेतली नाही. रैना कर्णधारपद सांभाळेल. एक काम करा, दोन तिकीट बुक करा. मी आणि विराट परत जातो, असं धोनी म्हणाला. त्यावर मॅनेजर गडबडला. म्हणाला, नाही नाही. तुम्ही खेळा. तुम्हाला जसं वाटतं ते करा, असं कामरानने सांगितलं. धोनीने असं का केलं? त्याचं उत्तरही कामरानने दिलं. धोनीच्या मते विराट हा बेस्ट खेळाडू आहे. जर तो दोन तीन समान्यात खराब खेळत असेल तर त्याला मागे का सोडायचं? असं धोनीचं मत होतं, त्यामुळेच त्याने विराटला सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असं कामरान म्हणाला.

2012-13मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध खेळण्यात आलेली वनडे सीरिज विराटसाठी अत्यंत खराब होती. त्यात त्याचा परफॉर्मन्स नव्हता. फॉर्म गेला होता. त्यातील तीन सामन्यात त्याने 4.33 च्या सरासरीने अवघे 13 रन बनवले होते. या संपूर्ण सीरीजमध्ये विराटने अवघे दोन चौकार लगावले होते. एका सामन्यात तर त्याने खातंही उघडलं नव्हतं.