Shoaib Akhtar Sonali Bendre : सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर शोएब अख्तरने मौन सोडलं

| Updated on: Jun 19, 2019 | 12:28 PM

क्रिकेटर्सच्या अफेयरची चर्चा सुरु होताच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्र यांची दबक्या आवाजात चर्चा होते.

Shoaib Akhtar Sonali Bendre : सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर शोएब अख्तरने मौन सोडलं
Follow us on

मुंबई : क्रिकेटर्सच्या अफेयरची चर्चा सुरु होताच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्र यांची दबक्या आवाजात चर्चा होते. शोएब अख्तरला सोनाली बेंद्र खूप आवडत होती, अख्तरच्या पाकिटात सोनालीचा फोटो होता असं सांगितलं जातं. इतकंच नाही जर सोनालीने मला नाकारलं तर मी तिचं अपहरण करेन, असं अख्तर म्हणाल्याची चर्चा होती. सध्या पुन्हा क्रिकेट वर्ल्डकप 2019 दरम्यान शोएब आणि सोनाली बेंद्रेच्या अफेयरची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. त्यावर स्वत: अख्तरने जाहीर स्पष्टीकरण दिलं आहे.

सोनाली बेंद्रेसोबत अफेयरची चर्चा धादांत खोटी आणि निराधार आहे. मी सोनालीला आजपर्यंत भेटलोच नाही, असं म्हणत अख्तरने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यूट्यूब चॅनलवर अख्तरने हे जाहीर सांगितलं. स्वत:च्या यूट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडीओत अख्तर म्हणतो, “मी आजपर्यंत सोनाली बेंद्रेला भेटलो नाही. ना मी तिचा फॅन होतो, ना तिचं कधी अपहरण करु इच्छित होतो”

याशिवाय अख्तर म्हणतो, “मी सोनालीचा कधी फॅन नव्हतो. तिला केवळ सिनेमांमध्ये पाहिलं आहे. ती सुंदर आहे. आजारपणातील सोनालीचा संघर्ष मी पाहिला. ती हिमतीने आजारातून बाहेर आली. तिने दाखवलेलं धाडस अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. हे पाहूनच मी सध्या तिचा फॅन झालो”

असं असलं तरी तिच्याशी माझे कोणतेही संबंध नाहीत. माझ्या खोलीत एकच फोटो लावलेला असायचा तो म्हणजे इम्रान खान यांचा. त्यांच्या व्यतिरिक्त मी कोणालाही आदर्श मानलं नाही, असंही अख्तर म्हणाला.

सोनाली सध्या आजारपणातून बाहेर आली आहे. त्यामुळे खोट्या बातमी पसरवून तिला पुन्हा वेदना देऊ नका. तिच्यासारख्या बहादूर मुलीचा फॅन व्हायला हवं. ती अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे, असं अख्तरने सांगितलं.

VIDEO: 

 


संबंधित बातम्या 

कॅन्सरशी झुंज देणारी सोनाली अखेर मायदेशी परतली   

राकेश रोशन यांना कॅन्सर, भावूक पोस्ट लिहून ऋतिकची माहिती