इस्लामाबाद : क्रिकेट विश्वात सध्या लग्नाचं वातावरण सुरु आहे. एक एक खेळाडू विवाहबद्ध होत आहेत. त्यातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीही (Shahid Afridi) लवकरच सासरा होणार आहे. म्हणजेच त्याच्या मोठ्या मुलीचा (Aqsa Afridi) साखरपुडा पार पडणार आहे. शाहिदचा होणारा जावईही क्रिकेटपटूच आहे. शाहिन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) असं त्याचं नाव. 20 वर्षीय शाहिन पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. याबाबतच खात्रीशीर वृत्त पाकिस्तानातील माध्यमांनी दिले आहे. (pakistani faster bolwer Shaheen Shah Afridi become son in law of former pakistan captain shahid afridi)
शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे विवाह शाहिनसोबत होणार आहे. अक्सा आणि शाहिने हे दोघे 20 वर्षाचे आहेत शाहिन क्रिकेट खेळतोय. तर अक्साचं शिक्षण सुरु आहे. त्यामुळे या दोघांचा हाय प्रोफाईल साखरपुडा 2 वर्षांच्या आतच पार पडणार आहे, याबाबतची माहिती पाकिस्तानमधील एका पत्रकाराने आपल्या ट्विटद्वारे दिली आहे. या पत्रकाराने ही माहिती दोन्ही परिवारांसोबत संवाद साधल्यानंतर दिली आहे.
With permission from both families, I would like to clarify the engagement rumours between Shaheen Afridi and the daughter of Shahid Afridi. The proposal has been accepted; it is thought that a formal engagement will be done within 2 yrs,following the completion of her education.
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) March 6, 2021
या वृत्तामुळे आता अक्सा आणि शाहिन पती पत्नी होणार हे निश्चित झालं आहे. एका रिपोर्टनुसार शाहिन आफ्रिदीचे वडील अयाज खान यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठीचा प्रस्ताव शाहिद आफ्रिदीच्या कुंटुंबासमोर ठेवला होता. हा लग्नाचा प्रस्ताव शाहिदच्या कुटुंबियांनी स्वीकार केला आहे. यामुळे आता मोठ्या धुमधडाक्यात दोघांचा साखरपुडा आणि त्यानंतर विवाह पार पडणार आहे.
हे दोन्ही परिवार आता एकत्र होणार असल्याने सोशल मीडियावरही याचा फिवर पाहायला मिळत आहे. एका युझरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पीएसएल स्पर्धेतील (PSL) आहे. या व्हिडीयोमध्ये शाहिनने आपल्या बोलिंगवर शाहिद आफ्रिदीला बोल्ड केलं. मात्र बाद केल्यानंतर त्यांने शाहिदची विकेट एन्जॉय केली नाही. त्यामुळे युझर्सने या व्हिडीओला एक कॅप्शन देत म्हटलं की, “शाहिनने शाहिदची विकेट सेलिब्रेट का केली नाही हे समजलं का?”
Shaheen Afridi didn't celebrate Shahid Afridi's wicket, Samjh rahe ho na aap? ? pic.twitter.com/KCYmVPotMn
— Ramiya 🙂 (@Yeh_tu_hoga) March 6, 2021
विशेष म्हणजे या दोन्ही कुटुंबाचं आडनाव सारखं आहे. शाहिन आणि अक्साचं वय हे सारखं आहे. दोघेही 20 वर्षीय आहेत. शाहिनच्या क्रिकेट कारकिर्दीला अवघ्या काही वर्षांपूर्वीच सुरुवात झाली आहे. शाहिनला त्याच्या क्रिकेटवर लक्ष द्यायचं आहे. तर अक्सा शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यामुळे साखरपुडा हा काही महिन्यानंतर करण्यात येणार आहे.
शाहिन आफ्रिदी पाकिस्तानच्या सिनिअर टीमचा महत्वाचा गोलंदाज आहे. शाहिनने आतापर्यंत एकूण 15 कसोटी, 22 एकदिवसीय आणि 21 टी सामन्यात त्याने पाकिस्तानचं प्रतिधिनित्व केलं आहे. त्याने कसोटीमध्ये 48, वनडेमध्ये 45 तर टी 20 मध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Shahid Afridi | ‘हा’ स्टार गोलंदाज बनणार शाहिद आफ्रिदीचा जावई
Jasprit Bumrah Marriage | जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार, अभिनेत्री की कॉमेंटेटर, दोन नावं चर्चेत
45 वर्षीय शाहीद आफ्रिदीला पाचवी मुलगी, नेटकरी म्हणाले, अजून 6 हव्या!
(pakistani faster bolwer Shaheen Shah Afridi become son in law of former pakistan captain shahid afridi)