मुंबई : भारत सध्या कोरोनाशी दोन हात करतोय. गेल्या वर्षभरापासून अधिक काळ भारताचं सरकार, प्रशासन कोरोनाशी (Corona Pandemic) धीरोदात्तपणे लढत आहे. भारतात आणखीनही कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या शेजारील देश पाकिस्तानचा (Pakistan) माजी खेळाडू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारतीयांसाठी अल्लाहकडे दुवा मागितली आहे. (Pakistani player Shoaib Akhtar Pray For indians Between Corona pandemic)
“भारतासाठी सध्याचा काळ हा मुश्कील काळ आहे. इथे दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे तर कित्येक जणांना औषधोपचार न मिळाल्याने जीवाला मुकत आहेत. मी अशा सर्व भारतीयांसाठी अल्लाहकडे दुवा मागतो. या सर्व परिस्थितीशी झुंजण्यास भारतीयांना बळ मिळो, अशी प्रार्थना करतो तसंच पाकिस्तान सरकारकडेही मी आवाहन करतो की भारताला ऑक्सिजनचा पुरवठा करुन मदत करावी”, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
Prayers with people of India. I hope things come in control soon & their government is able to handle the crisis better. We are all in it together. #IndiaNeedsOxygen #IndiaFightsCOVID19 #oneworld
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 23, 2021
“भारत सध्या एका कठीण काळातून जात आहे. कित्येकांना कोरोनाची लागण होतीय तर कित्येकांना जीव सोडावा लागतोय. अशा परिस्थितीत भारतासाठी ग्लोबर सपोर्टची गरज आहे. या महामारीच्या काळात आपण सगळे सोबत आहोत”, असं शोएब म्हणाला.
India is really struggling with Covid-19. Global support needed. Health care system is crashing. Its a Pandemic, we are all in it together. Must become each other’s support.
Full video: https://t.co/XmNp5oTBQ2#IndiaNeedsOxygen #COVID19 pic.twitter.com/vX1FCSlQjs— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 23, 2021
पुढे शोएब अख्तर म्हणतो, “हिंदुस्थानच्या सगळ्या नागरिकांसाठी माझ्या प्रार्थना आहेत. मला आशा आहे की ही सगळी स्थिती लवकरच नियंत्रणात येईल. सरकार आणि प्रशासनाच्या मदतीने भारत कोरोनावर लवकरच मात करेल. आपण सगळे सोबत आहोत”
(Pakistani player Shoaib Akhtar Pray For indians Between Corona pandemic)
हे ही वाचा :
IPL 2021 : केएल राहुलच्या बॅटवर बुमराहचा रिसर्च, शमीच्या साथीने कुंबळे सरांची शिकवणी!
Video : चहलच्या बायकोचा भांगडा पाहिलात का?, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ