उद्यापासून ऑस्ट्रेलियात (Austrolia) विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup 2022) सुरुवात होत आहे. टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्याविरुद्ध चांगली कामगिरी केल्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सुध्दा चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांची चर्चा आहे. टीम इंडियामध्ये धोनी सारखा एक खेळाडू खेळत असल्याचं वक्तव्य टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने केले आहे.
हार्दीक पांड्या सध्या चांगल्या लयमध्ये आहे, त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली करीत असल्यामुळे यंदाच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करणार आहे. मागच्या दोन मालिकेत हार्दीक पांड्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर सराव सामन्यात सुद्धा पांड्याने चांगली कामगिरी केली आहे.
सुरेश रैनाने हार्दीक पांड्याच्या कामगिरीची तारिफ केली आहे. तो धोनीसारखा खेळत आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांची धुलाई सुध्दा करेल.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.