नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवल्यानंतर सध्या टीम इंडियावर (Team India) चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रत्येक भारतीय क्रीडा रसिक भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशाने भारावून गेला आहे. या भावनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) अपवाद नाहीत. त्यांनीही ब्रिस्बेन कसोटीनंतर ट्विट करून टीम इंडियाची मुक्तकंठाने तारीफ केली. (PM Narendra Modi on Team India success in australia)
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाने आम्हाला अत्यानंद झाला आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय खेळाडुंमधील उर्जा आणि उमेद प्रकर्षाने दिसून आली. भारतीय खेळाडुंनी दाखविलेला दृढनिश्चय, धैर्य आणि त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी होती. भारतीय संघाचे अभिनंदन, भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
We are all overjoyed at the success of the Indian Cricket Team in Australia. Their remarkable energy and passion was visible throughout. So was their stellar intent, remarkable grit and determination. Congratulations to the team! Best wishes for your future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2021
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) टीम इंडियाने (Team India win) धडाकेबाज विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाचव्या दिवशी 3 विकेट्स राखून बाजी मारली आणि कांगारुंची घमेंड उतरवली. त्यानंतर बीसीसीआयने शाबासकी म्हणून टीम इंडियावर बक्षिसांची खैरात केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तब्बल पाच कोटी रुपयांचा घसघशीत बोनस जाहीर केला.
What a win!
I have lived on this earth for 284788 days!
One of the finest days of my life!
After hitting the lowest of 36 to hit the
highest of winning the series against a Great
bowling side.
Proud to be an #ndian— Raghunath Mashelkar (@rameshmashelkar) January 19, 2021
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्विट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवा हिरो मिळाला. मार बसल्यानंतर प्रत्येकवेळी आपण नेटाने उभे राहिलो आणि आणखी चांगली कामगिरी करुन दाखविली. निष्काळजीपणे नव्हे तर निर्भीडपणे कसे खेळायचे याच्या कक्षा आपण आणखी रुंदावल्या. आपण दुखापत आणि अनिश्चिततेला संयम आणि आत्मविश्वासाने प्रत्युत्तर दिले. हा विजय ऐतिहासिक आहे, असे सचिन तेंडुलकर याने ट्विट करुन म्हटले.
संबंधित बातम्या:
Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला
(PM Narendra Modi on Team India success in australia)