मुंबई : सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध पुनरागमनाच्या सामन्यात अर्धशतक केल्यानंतर बॅट उंचावणारा पृथ्वी शॉ टीकेचा धनी होत आहे. ‘आता माझी बॅटच बोलेल’ या आशयाचे हातवारे पृथ्वीने (Prithvi Shaw Arrogant Gesture) केल्यामुळे त्याला धारेवर धरलं जात आहे.
अर्धशतकाचा आनंद व्यक्त केल्यानंतर पृथ्वी शॉचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ‘बीसीसीआय’ने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पृथ्वीचे हातवारे त्याची गुर्मी दाखवत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Welcome back! He is making a comeback today and @PrithviShaw makes it a memorable one with a fine-half century for Mumbai against Assam in @Paytm #MushtaqAliT20. pic.twitter.com/hiBfiElhed
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 17, 2019
डोपिंग प्रकरणात आठ महिन्यांची बंदी सुनावल्यानंतर 20 वर्षीय पृथ्वी शॉने डोमेस्टिक सामन्यातून पुनरागमन केलं. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून पृथ्वी खेळत होता. त्याने 39 चेंडूंमध्ये 63 धावांची खेळी केली.
‘युवा क्रिकेटपटूंचा तोरा अविश्वसनीय आहे. बंदीनंतर आलेला हो पोरगा अर्धशतक करतो, तेही यथातथा गोलंदाजांसमोर. इतका माज बरा नाही’ असं एका ट्विटर युझरने म्हटलं आहे.
This is the problem with the young players. Coming Back from a ban, scoring a half century against a relatively weaker bowling attack, and then making gestures. They need to learn to be humble. This over confident kid won’t last long in the international arena. MARK MY WORDS!
— Shubham Agrawal (@imShubhamA) November 17, 2019
Shaw is so overrated. Shaw is the next Kambli. He will throw it away with this kind of poor attitude and arrogance.
— Raghav Nelli (@rnelli) November 17, 2019
डोपिंग प्रकरणी कारवाई
कफ सिरपमध्ये आढळणारा प्रतिबंधित घटक पृथ्वी शॉने घेतला होता. त्यामुळे तो अँटी-डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या वेळी 22 फेब्रुवारी 2019 रोजी इंदूरमध्ये पृथ्वी शॉने डोपिंग चाचणीसाठी सॅम्पल दिले होते. Terbutaline नावाच्या औषधाचं पृथ्वी शॉने सेवन केल्याचं निष्पन्न झालं होतं. हा पदार्थ ‘वाडा’ने बंदी घातलेल्या यादीमध्ये आहे.
डोपिंगमध्ये बंदी असलेला घटक आढळून आल्यानंतर पृथ्वी शॉने 16 जुलै रोजी स्पष्टीकरण दिलं होतं. कफ सिरपसाठी हे औषध घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. बीसीसीआयने हे स्पष्टीकरण मान्य केलं. 16 मार्च 2019 ते 15 नोव्हेंबर 2019 या कालावधीसाठी पृथ्वी शॉवर बंदी लागू करण्यात (Prithvi Shaw Arrogant Gesture) आली होती.