मंबई : आयपीएलच्या बाराव्या मोसमात रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांना फायनलचा अनुभव आहेच, तरीही ही लढत पुन्हा एकदा चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. कारण, या आयपीएलमध्ये मुंबईने आतापर्यंत सलग तीन वेळा चेन्नईवर मात केली आहे. चॅम्पियन होणाऱ्या संघावर पैशांचा पाऊस पडणार आहे. चॅम्पियन टीमला 20 कोटी रुपये बक्षीस असेल. तर उपविजेत्या संघाला 12.5 कोटींचं बक्षीस मिळेल. याशिवाय विविध श्रेणींमध्येही बक्षीस वितरण होईल.
कुणाला किती पैसे मिळणार?
अंतिम सामन्यातील विजेता संघ : 20 कोटी रुपयांचा चेक
रनर्स-अप : 12.5 कोटी रुपयांचा चेक
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) : 10 लाख रुपयांचा चेक
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट) : 10 लाख रुपयांचा चेक
एमर्जिंग प्लेयर अवॉर्ड- बक्षीस 10 लाख रुपये
आतापर्यंतच्या टॉप 5 फलंदाजांची यादी
डेविड वॉर्नर (हैदराबाद): 12 मॅच, 692 धावा, 100* बेस्ट, 69.20 सरासरी
लोकेश राहुल (पंजाब): 14 मॅच, 593 धावा, 100* बेस्ट, 53.90 सरासरी
शिखर धवन (दिल्ली) : 16 मॅच, 521 धावा, 97* बेस्ट, 34.73 सरासरी
आंद्रे रसेल (कोलकाता) : 14 मॅच, 510 धावा, 80* बेस्ट, 56.66 सरासरी
क्विंटन डी कॉक (मुंबई) : 15 मॅच, 500 धावा, 81 बेस्ट, 35.71 सरासरी
आतापर्यंतच्या टॉप 5 फलंदाजांची यादी
कॅगिसो रबाडा (दिल्ली) 12 मॅच 25 विकेट
इमरान ताहीर (चेन्नई) 16 मॅच 24 विकेट
श्रेयस गोपाल (राजस्थान) 14 मॅच 20 विकेट
दीपक चहर (चेन्नई) 16 मॅच 19 विकेट
खलील अहमद (हैदराबाद) 9 मॅच 19 विकेट
आईपीएल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट (Most Valuable Player) : बक्षीस – 10 लाख रुपये
आतापर्यंतचे Most Valuable Player
2008 – शेन वॉट्सन
2009 – एडम गिलख्रिस्ट
2010 – सचिन तेंडुलकर
2011 – ख्रिस गेल
2012 – सुनील नारायण
2013 – शेन वॉट्सन
2014 – ग्लेन मॅक्सवेल
2015 – आंद्रे रसेल
2016 – विराट कोहली
2017 – बेन स्टोक्स
2018 – सुनील नारायण