वर्ल्ड कपसाठी विराटला ‘PUMA’कडून स्पेशल गिफ्ट

| Updated on: May 22, 2019 | 8:47 AM

मुंबई : येत्या 30 मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. या विश्वचषकासाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला प्यूमा (PUMA) कंपनीने स्पेशल गिफ्ट दिले आहे. प्यूमा या प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँडद्वारे स्पेशल अॅडिशन शूज डिझाईन करण्यात आले आहेत. या शूजचे जगभरात केवळ 150 शूज उपलब्ध असणार आहेत. विराटला दिलेल्या या शूजसोबत त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला […]

वर्ल्ड कपसाठी विराटला PUMAकडून स्पेशल गिफ्ट
Follow us on

मुंबई : येत्या 30 मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. या विश्वचषकासाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला प्यूमा (PUMA) कंपनीने स्पेशल गिफ्ट दिले आहे. प्यूमा या प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँडद्वारे स्पेशल अॅडिशन शूज डिझाईन करण्यात आले आहेत. या शूजचे जगभरात केवळ 150 शूज उपलब्ध असणार आहेत.

विराटला दिलेल्या या शूजसोबत त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने प्यूमा कंपनीच्या या शूजची माहिती दिली आहे.

माझ्या वर्ल्ड कपचे शूज तयार आहे. सोनेरी रंगाची स्पाईक आणि पांढऱ्या रंगाचे शूज घालून वर्ल्ड कपच्या मैदानात उतरण्यासाठी मी फार उत्सुक आहे. अशाप्रकारचे शूज बनवल्यामुळे मी प्यूमा परिवाराचा फार आभारी आहे. प्यूमा कंपनीने पहिल्यांदाच अशाप्रकारचे गोल्ड शूज तयार केले आहेत. विशेष म्हणजे हे शूज वर्ल्ड कपसाठी स्पेशल तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्यूमाने भारतात आणि जगभरात याप्रकारचे केवळ 150 शूज बनवले आहेत, असे विराटने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

प्यूमा कंपनीने तयार केलेल्या या शूजचे नाव वन-8 असे आहे. हे शूज पांढऱ्या रंगाचे असून त्याला गोल्डन रंगाची स्पाईक देण्यात आली आहे.  हे प्यूमा कंपनीचे स्पेशल अॅडिशन शूज आहेत. याचे फक्त 150 शूज बनवण्यात येणार आहे. त्यामुळे हे शूज जगभरातील केवळ 150 लोकांकडेच असणार आहे. या शूजची किंमत 19  हजार 999 रुपये इतकी आहे.

क्रिकेट विश्वचषकाची येत्या 30 मे पासून सुरुवात होत आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगणार आहे. या विश्वचषकासाठी टीम इंडिया नुकतीच रवाना झाली.  विराट कोहलीचा हा तिसरा विश्वचषक असला तरी कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच जबाबदारी सांभाळणार आहे.

टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, एम.एस. धोनी, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचा भारतीय टीममध्ये समावेश असणार आहे.