नवी दिल्ली: पंजाब किंग्जचा कॅप्टन के. एल. राहुल (KL Rahul) याला पोटात दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. के. एल. राहुल याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरित सामन्यांमध्ये के. एल. राहुल पंजाबसाठी खेळू शकेल की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Punjab kings skipper kl Rahul hospitalised after getting diagnosed with acute appendicitis to surgery tweet by team)
काल रात्री के.एल. राहुलच्या पोटात वेदना सुरु झाल्या होत्या. प्राथमिक वैद्यकीय उपचार करुनही वेदना थांबत नव्हत्या. यानंतर तातडीनं पुढील तपासणी केली असता त्याला अॅपेंडिक्स असल्याचं समोर आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं केल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता राहुलवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.
Praying for KL Rahul’s health and speedy recovery ?❤️#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 pic.twitter.com/q81OtUz297
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 2, 2021
के.एल. राहुलच्या सर्वाधिक धावा
आयपीएलच्या 14 व्या हंगामात राहुलनं सर्वाधिक 331 धावा केल्या आहेत. त्यानं सात मॅचेसमध्ये 66.20 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. राहुलच्या जागेवर कर्णधार म्हणून कोण काम करणार याविषयी संघ व्यवस्थापनानं कोणतीही घोषणा केली नाही. ख्रिस गेल किंवा मयंक अग्रवाल पंजाब किंग्जचा कर्णधार असू शकतो.
पंजाब किंग्ज सध्या आयपीएलच्या पॉईंटटेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जनं आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 मॅचमध्ये पंजाबचा विजय झाला आहे. तर, चार सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंजाबनं गेल्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा पराभव केला आहे.
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी राहुलच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून, ट्विट केलं आहे.
Wish KL Rahul well with his surgery for appendicitis and a quick recovery thereafter.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) May 2, 2021
संबंधित बातम्या:
RR vs SRH Live Score, IPL 2021 | हैदराबादला मोठा झटका, कर्णधार केन विलियमनस आऊट
(Punjab kings skipper kl Rahul hospitalised after getting diagnosed with acute appendicitis to surgery tweet by team)