नवी दिल्लीः बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत (Badminton in mixed team competition) भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात जोरदार सामना झाला. भारतीय संघानेही चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा 5-0 ने पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) स्टार खेळाडूंसोबतच भारतीय संघात युवा खेळाडूंचाही भरणा करण्यात आला आहे. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हाही भारताकडून पाकिस्तानला दारुण पराभव पत्करावा लागला होता. यावेळी त्याची पुनरावृत्ती झाल्याने भारतीय खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सध्या रोमांचकारी सामन्यांचे पर्व सुरू आहे.
#CommonwealthGames | In Badminton,
* India beat Pakistan by 3-0 in opening group stage match of mix team event
* PV Sindhu beat Pakistan’s Mahoor Shahzad 21-7 21-6
* Kidambi Srikanth beat Pak’s Murad Ali 21-7 21-12
* Ashwini Ponappa/Sumeeth Reddy beat Pak pair 21-9 21-12 pic.twitter.com/1IyxMi7KVA
— ANI (@ANI) July 29, 2022
अलेक्झांडर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने पाकिस्तानचा 5-0 ने पराभव केला. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचाही यावेळी सहभाग आहे. यावेळी भारतीय खेळाडूंकडून पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय मिळविण्यात आला.
या सामन्यावळी भारतीय संघाकडून पाकिस्तानचा 5-0 अशा फरकाने पराभव करण्यात आला. अंतिम सामन्यावेळी गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांनी माहूर शहजाद आणि गझला सिद्दीकी या जोडीचा 21-4 आणि 21-5 असा पराभव केला.
राष्ट्रकुलच्या या सामन्यात भारतीय संघ 4-0 ने पुढे आहे तर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकी रेड्डी-चिराग शेट्टी यांनी मुहम्मद इरफान सईद भाटी आणि मुराद अली यांचा 21-12, 21-9 असा पराभव करण्यात आला आहे. आता शेवटच्या सामन्यात गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांचा सामना माहूर शहजाद-गझला सिद्दीकी यांच्यात झाला.
या स्पर्धेत पीव्ही सिंधूने शानदार कामगिरी करत माहूर शहजादचा पराभव केला असून भारताने 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. सिंधूने माहूर शहजादचा 21-7, 21-6 असा पराभव केला.
भारतीय संघाबद्दल सांगितले जात आहे की एकेरी गटात पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत यासारखे खेळाडू आहेत. दुहेरीत सात्विक साईराज-चिराग शेट्टी ही जोडीही अजून स्पर्धेत आशादायी राहिली आहे. महिला दुहेरी गटात गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली, तर मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा- सुमित रेड्डी यांच्यावर भारतीय चाहत्यांनी आशा ठेवली आहे. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने होते तेव्हा भारताकडून पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळविण्यात आला होता.