आपल्या उत्तम खेळाने अनेक स्पर्धांत यश मिळवणारी, भारताचं नाव उज्ज्वल करणारी स्टार खेळाडू, बॅटमिंटनपटून पी.व्ही.सिंधू आता आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहे. दोन वेळा ऑलिंपिक मेडल जिंकणारी सिंधू लवकरच लग्न करणार आहे.तिच्या वडिलांनी काल, 2 डिसेंबरला सिंधूच्या लग्नाची बातमी चाहते आणि मीडियासमोबत शेअर केली. भारतीय स्टार खेळाडू सिंधूचं लग्न कधी होणार, कोणाशी होणार, तो मुलगा काय करतो या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना भरूपर उत्सुकता आहे. चला तर मगा जाणून घेऊया…
पी.व्ही सिंधूच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचं लग्न याच महिन्यात होणार. हैदराबादमधील एक बिझनेस एक्झिक्युटिव्हशी ती लग्नगाठ बांधणार आहे. 22 डिसेंबर रोजी हा विवाह सोहळा पार पडणार असून त्यानंतर रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
लेक सिटी उदयपूरमध्ये होणार लग्न
रविवारी 1 डिसेंबर रोजी सय्यद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट जिंकून चाहत्यांना आनंदित करणाऱ्या पीव्ही सिंधूने आता सर्वांना डबल सेलिब्रेट करण्याची संधी दिली आहे. सिंधूचे लग्न हैदराबादमधील एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी व्यंकट दत्ता यांच्याशी होणार आहे. तोसुद्धा हैदराबादचा रहिवासी आहे. सिंधूचे पिता पी.व्ही. रमण्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थामधील ‘लेक सिटी’ (तलावांचं शहर) उदयपूरमध्ये येत्या 22 डिसेंबरला हा लग्न सोहळा होईल. दोघांचंही कुटुंब बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतं. महिन्याभरापूर्वीच लग्नाचा निर्णय झाला. मात्र सिंधूचं व्यस्त वेळापत्रक पाहता, 22 डिसेंबर ही तारीख लग्नासाठी निश्चित करण्यात आली.
20 डिसेंबरपासून लग्नाचे विधी सुरू होतील आणि 22 डिसेंबरला सिंधू आणि वेंकट विधींवतएकमेकांशी लग्न करतील, असेही तिच्या वडिलांनी सांगितले. यानंतर 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करण्यात येणार आहे.
होणारा पती कोण ?
पी.व्ही. सिंधू हिचा होणारा पती वेंकट दत्ता याच्याबद्दल सांगायचं झालं तर तो पोसिडेक्स टेक्नोलॉजी मध्ये एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहे. मात्र तो फक्त टेक्नॉलॉजी कंपनीशी जोडलेला नाही, तर यापूर्वी जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीग, आयपीएलशी देखील त्याचं नातं होतं. वेंकटाने त्यांच्या लिंक्डइन बायोमध्ये देखील याचा उल्लेख केला आहे, तो आयपीएल फ्रँचायझीचे व्यवस्थापन करत होता, असे त्याने नमूद केलंय. मात्र, त्यात त्याने त्या फ्रँचायझीच्या नावाचा मात्र उल्लेख केलेला नाही.
खराब फॉर्मनंतर आयुष्याची नवी सुरूवात
पी.व्ही. सिंधूबद्दल सांगायचं झालं तर, भारताची एक यशस्वी बॅडमिंटन स्टार असलेल्या तिच्या आयुष्याची नवी सुरूवात होत आहे. गेल्या काही काळापासून ती खराब फ़र्मचा सामना करत होती. बरेच दिवस तिला कोणतेही मोठे यश मिळवता आले नव्हते. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तिला यश मिळू शकले नाही. लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकणारी सिंधू पहिल्यांदाच रिकाम्या हाताने परतली. एवढंच नव्हे तर यंदा तिला कोणत्याही मोठ्या स्पर्धेत विजेतेपद पटकावता आले नाही. त्याशिवाय तिच्या फिटनेसचा प्रश्नही कायम होता. मात्र याच आव्हानांचा सामना करत 1 डिसेंबर रोजी सिंधूने प्रतिष्ठित सय्यद मोदी स्पर्धा जिंकून पुनरागमन केले. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी तिने हैदराबादमध्ये आपल्या बॅडमिंटन अकादमीची पायाभरणीही केली होती.