नवी दिल्ली : भारतीय संघाचा ऑफस्पिनर आर. अश्विन (R Ashwin) आणि नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) नुकत्याच घोषित केलेल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या महिन्याच्या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. अश्विन आणि पंत व्यतिरिक्त भारताचा मोहम्मद सिराज आणि टी नटराजन हेही या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. (R Ashwin And Rishabh pant Nominated For New ICC Player of match Award For Month)
ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयात या सर्वांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आयसीसीने म्हटले आहे की हा पुरस्कार वर्षभरात प्रत्येक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणा महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना देण्यात येईल. जानेवारी महिन्यासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रूट, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ, अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाज, दक्षिण आफ्रिकेचा मारिजणे काप आणि नॅडिन डी क्लार्क आणि पाकिस्तानची निदा दारही या शर्यतीत आहेत.
आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, चाहत्यांना दरमहा ऑनलाईन मतदान करण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. ऑनलाइन मतांबरोबरच आयसीसीची स्वतंत्र मतदान अकादमीही तयार करण्यात आली असून त्यात माजी खेळाडू, प्रसारक आणि पत्रकारांचा समावेश असेल.
“सर्वोत्कृष्ट खेळाडूचा महिन्याचा पुरस्कार म्हणून त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या कामगिरीचे कौतुक करणाऱ्या चाहत्यांना खेळाडूंशी संपर्क साधण्याची त्यांना सुवर्णसंधी मिळेल”, असं आयसीसीचे सरव्यवस्थापक जेफ अलार्डिस म्हणाले. आयसीसीच्या पुरस्कार नामांकन समितीद्वारे प्रत्येक प्रवर्गासाठी तीन अर्ज निश्चित केले जातील.
मतदान अकादमी ईमेलद्वारे मतदान करेल जे एकूण मतांच्या 90 टक्के असेल. महिन्याच्या पहिल्या दिवशी, आयसीसीकडे नोंदणीकृत चाहते आयसीसीच्या संकेतस्थळावर आपले मत नोंदवू शकतील, जे एकूण मतदानाच्या दहा टक्के असेल. महिन्याच्या दुसर्या सोमवारी विजेत्याची घोषणा केली जाईल. (R Ashwin And Rishabh pant Nominated For New ICC Player of match Award For Month)
हे ही वाचा :
Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीवर तातडीची शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकणार
ICC ODI Rankings: विराट कोहली-रोहित शर्माचा दबदबा कायम, बुमराह तिसऱ्या क्रमांकावर तर जाडेजाची घसरण
Corona | ‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटू बंधूना कोरोनाची लागण, मोठ्या स्पर्धेला मुकणार