मुंबई : अशोक डिंडानंतर टीम इंडियाच्या (Team India) आणखी एका स्टार गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आर विनय कुमारने (R Vinay Kumar) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कुमारने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विनय कुमारने टीम इंडियाच्या सर्व सहकाऱ्यांचं, टीम मॅनेजमेंटचे तसेच क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत. विनयने आपल्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 नोव्हेंबर 2013 मध्ये खेळला होता. विनय कुमार गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. (r vinay kumar has announced retirement from International Cricket)
Thankyou all for your love and support throughout my career. Today I hang up my boots. ??❤️ #ProudIndian pic.twitter.com/ht0THqWTdP
— Vinay Kumar R (@Vinay_Kumar_R) February 26, 2021
आर विनय कुमारने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 31 एकदिवसीय, 9 टी 20 तर एकमात्र टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. यामध्ये त्याने अनुक्रमे वनडेमध्ये 31, टी 20 मध्ये 10 तर टेस्टमध्ये 1 विकेट घेतली होती.
कुमारने आयपीएलमध्ये 105 सामने खेळले आहेत. यात त्याने 28.25 च्या सरासरीने तसेच 8.39 या इकॉनॉमी रेटने 105 विकेट्स पटकावल्या होत्या. 4 विकेट्स देऊन 40 धावा ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी होती.
संबंधित बातम्या :
(r vinay kumar has announced retirement from International Cricket)