मुंबई : टीम इंडियाचे (IND) नवे प्रशिक्षक कमकुवत असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आहे. तसेच टीम इंडिया माजी खेळाडू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सुध्दा राहूल द्रविडने (Rahul Dravid) विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विश्रांती घेतल्यामुळे जोरदार टीका केली होती. विश्रांतीची काय गरज आहे. खेळाडूंना समजून घ्या, त्यांना बदल करायला सांगा असा सल्ला देखील शास्त्रींनी दिला होता. विश्वचषक स्पर्धा, त्यानंतर न्यूझिलंड, आणि बांगलादेश दौऱ्यात टीम इंडियाची खराब कामगिरी होत असल्यामुळे हे तीन दिग्गज द्रविड विकेट काढू शकतात.
महेंद्रसिंग धोनी हा असा खेळाडू आहे, ज्याने आतापर्यंत स्वत: चा फिटनेस चांगला ठेवला आहे. त्यामुळे तो अजून भारतात आयपीएल खेळताना अजून दिसत आहे. पुढच्यावर्षी होणारी आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर धोनी निवृत्त होणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. बीसीसीआय धोनीला एक मोठं पद देण्याच्या तयारी आहे. तसेच पुढच्यावर्षी भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे.विशेष म्हणजे धोनीने टीम इंडियाला दोनवेळा विश्वचषक जिंकून दिले आहेत.
टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याने सुद्धा बीसीसीआयला अनेक प्रशिक्षकपद मिळावे म्हणून अर्ज केला आहे. पण त्याला डावलून रवी शास्त्री आणि राहूल द्रविडला बीसीसीआयने संधी दिली. त्यामुळे राहूलनंतर सेहवागला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या टीम इंडियाला धडाकेबाज कोचची गरज आहे.
माइक हेसन हे न्यूझिलंडचे माजी कोच राहिले आहेत. ते ज्यावेळी न्यूझिलंड टीमचे कोच राहिले आहेत. त्यावेळी न्यूझिलंड टीम चांगल्या स्थितीत राहिली आहे. तसेच परदेशातील दौऱ्यात सुद्धा टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे माइक हेसनच्या नावाचा सुध्दा विचार केला जाऊ शकतो.