मुंबई : भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. क्रिकेट खेळत नसलं तरी प्रत्येकाला त्याबाबत माहिती आहे. अनेकदा स्कोअर किती झाला? इथपासून चुकीचा शॉट खेळला, अशी चर्चा गल्लोगल्ली रंगते. खरं तर काही वर्षांपूर्वी क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ आहे, अशी समज होती. पण आता मुलीही यात मागे नाहीत. नुकतंच अंडर 19 महिला संघांन वर्ल्डकप जेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे तरुणीही क्रिकेटमध्ये कुठे मागे नाहीत असंच म्हणावं लागेल. नुकताच राजस्थानमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील रेणुका पारगी खेळताना दिसत आहे. तिची फलंदाजी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. नेटकऱ्यांना तिने आपल्या फलंदाजीने आश्चर्यचकीत केलं आहे. इतकंच काय तर मुलांच्या गोलंदाजीवर ती षटकार ठोकते. विशेष म्हणजे तिने 2 वर्षांपूर्वी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओमुळे रेणुकाची आता चर्चा होऊ लागली आहे.
रेणुकाचा व्हायरल व्हिडीओची दखल आता प्रत्येक स्तरातून घेतली जात आहे. राजस्थानचे भाजपा प्रदेश अध्यक्ष सतीश पुनिया यांनी तिच्या भविष्याची जबाबदारी उचलली आहे. त्याचबरोबर तिला प्रोत्साहान देण्यासाठी क्रिकेट किट पाठवलं आहे. इतकंच काय तर सतीश पुनिया यांनी तिच्याशी चर्चाही केली आहे. लवकरच तिला जयपूरमध्ये बोलवून एक सामना खेळवला जाणार आहे. या माध्यमातून तिला भविष्याचा वेध घेता येईल.
This is Renuka Pargi a tribal daughter studying at a government school in Piplia a small village in dhariyawad block of Rajasthan Pratapgarh district if @BCCI rightly pays attention to such talents @BCCIWomen will get good players। @JayShah @tribesindia @cricketworldcup @PIB_MoTA pic.twitter.com/KPO9TUvEme
— Tulsiram bhil aadivasi birsa Lover (@BirsaAadivasi) February 20, 2023
रेणुका पारगी राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील आदिवासी भागातून येते. ती सध्या रामेतालाब गावातील शाळेत शिक्षण घेत आहे. तिथेच तिला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली.या शाळेत ईश्वरलाल मीणा यांनी तिला क्रिकेटचं गमभन शिकवलं.
“रेणुकाला दोन वर्षांपूर्वी क्रिकेटचं इतकं माहिती नव्हतं. पण तिला क्रिकेट खेळायची आवड होती. त्यामुळे ती हा तांत्रिकदृष्ट्या लवकर शिकली. तिच्या चांगलं क्रिकेट आहे. रेणुकाने चांगलं क्रिकेट फक्त दोन वर्षात शिकलं आहे. आता तिला पुढे जाण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.”, असं प्रशिक्षक ईश्वरलाल मीणा यांनी सांगितलं.