दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) 12 वा सामना 30 सप्टेंबरला खेळण्यात आला. हा 12 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने सलग 2 सामने जिंकणाऱ्या राजस्थानचा 37 धावांनी एकतर्फी पराभव केला. या सामन्यात जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) 4 ओव्हर टाकल्या. यात त्याने 4. 50 च्या इकोनॉमीने अवघ्या 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यात सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले. जोफ्राने आपल्या बोलिंग दरम्यान एक विक्रम केला आहे. (Rajasthan Royals Jofra Archer Delivered Fastest Bowl)
Fantastic four by Archer tonight! ?#RRvKKR | #HallaBol | #RoyalsFamily | @JofraArcher pic.twitter.com/jsbXzk4giu
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 30, 2020
जोफ्रा आर्चरने सामन्याच्या पहिल्या डावात हा विक्रम केला. कोलकाता विरुद्ध बोलिंग करताना आर्चरने 13 व्या ओव्हरमधील चौथा बोल चक्क ताशी 150 किमीपेक्षा अधिक वेगाने टाकला. आर्चरने हा बोल ताशी 151. 4 किलोमीटर वेगाने टाकला. यासह आर्चरने आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली आहे. आर्चर आयपीएल 2020 मध्ये सर्वात वेगवान बोल टाकणारा बॉलर ठरला. याआधी जोफ्रा आर्चरने 2018 मध्येही अशीच कामगिरी केली होती. जोफ्राने 2018 मध्ये ताशी 152. 39 किमी वेगाने बोल टाकला होता.
दरम्यान याआधी 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत जोफ्रा आर्चरने असाच वेगवान बोल टाकला होता. आर्चरने बांग्लादेश विरुद्धातील सामन्यात चक्क ताशी 153 किमीच्या वेगाने बॉल टाकला होता.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात वेगाने बोल टाकण्याचा विक्रम बोलर डेल स्टेनच्या (Dale Steyn) नावावर आहे. स्टेनने डेक्कन चार्जर्सकडून खेळताना ताशी 154. 40 किमी इतक्या वेगाने बोल टाकण्याचा कारनामा केला होता.
जोफ्रा आर्चरने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आर्चरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 29 विकेट्स घेतल्या आहेत. 3/15 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. तसेच जोफ्राने बॅटिंगद्वारे 128 धावा केल्या होत्या. 27 नाबाद ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.
संबंधित बातम्या :
IPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे…, राजस्थानवर 37 धावांनी मात
(Rajasthan Royals Jofra Archer Delivered Fastest Bowl)