मुंबई : राजस्थान रॉयल्सकडून (RR) 6 सामने खेळणाऱ्या पाकिस्तानच्या कामरान अकमल (Kamran Akmal) या खेळडूला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) कायदेशीर विभागाकडून एक नोटीस पाठवली आहे. कामरान अकमल याने सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सुत्रांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार ही नोटीस रमीज राजाच्या कायदेशीर विभागाकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आणखी काही खेळाडूंना कायदेशीर नोटीस देण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती सुत्रांनी दिली आहे.
कामरान अकमलवरती नेमके कोणते आरोप करण्यात आले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कायदेशीर विभागाकडून कोणत्या कारणामुळे नोटीस पाठवली आहे, हे नोटीसमध्ये स्पष्ट केलं आहे. कामरान अकमल याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डबाबत चुकीचं वक्तव्य केल्यामुळे त्याला नोटीस देण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अजून काही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना नोटीस पाठवण्याच्या तयारी आहे. कारण त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डबाबत चुकीची टिपणी केली आहे. त्यामुळे नोटीस दिल्यानंतर काय कारवाई करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विरोधात टीव्ही आणि युट्यूबच्या माध्यमातून चुकीची वक्तव्ये करीत असतील, तर त्यांना समज देणे गरजेचे आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कायदेशीर विभागाकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे.