मुंबई : एप्रिलनंतर भारताता कोरोनाचे (Corona) मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले. त्यात आयपीएलचं (IPL 2021) आयोजन भारतात करणं हे जोखमीचं समजलं जात होतं. अशा परिस्थिती आयपीएल भारतात खेळवणं हे धोकादायक ठरु शकतं, अशी भिती व्यक्त करण्यात येत होती. अखेर ज्याचीच भिती होती तेच झालं. एकामागोमाग एक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करावा लागला. 3 मे ला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यान्याआधी 2 खेळाडू बाधित सापडले. त्यामुळे हा सामना स्थगित करावा लागला. मात्र त्यानंतर आणखी खेळाडूंना कोरोनाने गाठलं. यामुळे सर्वच बाजूने आयपीएल स्थगित करण्याची मागणी जोर धरु लागली. यामुळे नाईलाजस्तोर स्पर्धा स्थगितीचा निर्णय घ्यावा लागला. या स्थगितीच्या निर्णयाचा 3 संघाना फायदा झाला आहे. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Rajasthan Royals Punjab Kings and Sunrisers Hyderabad benefit from IPL 2021 postponement)
सनरायजर्स हैदराबादसाठी हा 14 वा मोसम निराशाजनक राहिला. या निराशाजनक कामगिरीसाठी टीम मॅनेजमेंटने डेव्हिड वॉर्नरची (David Warner) कर्णधार पदावरुन उचलबांगडी केली. त्यानंतर केन विलियमसनकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्यानंतरही केनलाही विशेष काही करता आले नाही. हैदराबादने या हंगामात एकूण 7 सामने खेळले. त्यापैकी 6 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तर 1 विजय मिळवता आला. यामुळे हैदराबादसाठी बाद फेरीत प्रवेश मिळवणं आव्हानात्मक ठरलं असतं. यामुळे ही स्थगिती हैदराबादच्या पथ्यावर पडली, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
पंजाबने या मोसमासाठी टीमच्या नावात बदल केला. किंग्स इलेव्हन पंजाबवरुन पंजाब किंग्स असे संघाचे नामकरण करण्यात आले. मात्र टीमच्या कामगिरीत विशेष असा बदल झाला नाही. पूर्ण संघ एकदुकट्या खेळाडूवर अवलंबून होता. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) विकेटकीपर आणि फलंदाज अशा तिनही भूमिका यशस्वीरित्या पार पाडत होता. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने मयंक अग्रवालचा अपवाद वगळता कोणीही चांगली साथ दिली नाही.
दरम्यान काही सामन्यानंतर केएलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी मयंकला मिळाली. मयंकने त्या सामन्यात नाबाद 99 धावांची खेळी केली. पण त्या सामन्यातही पंजाबच्या हाती निराशाच पडली. पंजाबने या हंगामातील 8 सामन्यांपैकी 5 सामन्यात पराभव स्वीकारला तर 3 सामन्यात विजय मिळवला. यामुळे पंजाबसाठी प्लेऑफचा मार्ग खडतर होता. त्यामुळे पंजाबसाठी ही स्थगिती नक्कीच फायदेशीर आहे.
आयपीएलच्या सुरुवातीआधी राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) करारमुक्त केलं. स्मिथच्या जागी युवा फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) कर्णधार केलं गेलं. संजूच्या नेतृत्वात राजस्थानने 7 सामने खेळले. यापैकी राजस्थानला 3 सामन्यात विजय आणि 4 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. यामुळे राजस्थानची कामगिरीही समाधनकारक राहिली. यामुळे हा मोसम स्थगित झाल्याने राजस्थानला किंचीत दिलासा मिळाला आहे.
संबंधित बातम्या |
(Rajasthan Royals Punjab Kings and Sunrisers Hyderabad benefit from IPL 2021 postponement)